रेल्वेमधून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2023 20:46 IST2023-03-14T20:45:52+5:302023-03-14T20:46:01+5:30

नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वाघ करीत आहेत.

Old man dies after falling from train in nashik | रेल्वेमधून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

रेल्वेमधून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

नांदगाव (नाशिक) : तालुक्यातील न्यायडोंगरी येथे सुदाम शंकर बोदरे (८३) यांचा रेल्वे गाडीतून पडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती न्यायडोंगरी रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक मीना यांनी नांदगाव पोलिसांना दिली.

नांदगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायडोंगरी येथील सुदाम शंकर बोदरे (८३) यांचा अज्ञात रेल्वे गाडीमधून पडून मृत्यू झाला आहे. पोल क्रमांक ३००/०५ जवळ एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. त्यांची ओळख नंतर पटली. नांदगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वाघ करीत आहेत.

Web Title: Old man dies after falling from train in nashik