नाशिक : मखमलाबाद रोडवरील शिवदर्शन अपार्टमेंटमध्ये कुटुंबीयांसमवेत राहणारे माधव तुळशीराम भडांगे (७५) हे वृद्ध फिरून येतो असे सांगून घराबाहेर पडले. ते अद्याप परतलेले नाही. शनिवारी (दि.११) दुपारी साडेबारा वाजेपासून घराबाहेर पडलेले भडांगे परतले नसल्याने त्यांचा नातू किरण भडांगे याने पंचवटी पोलीस ठाण्यात रविवारी आजोबा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. भडांगे यांना स्मृतिभ्रंशचा त्रास आहे. भडांगे यांची शरीरयष्टी सडपातळ असून, रंग सावळा आहे. उंची साधारणत: ५ फूट इतकी असून, पांढरा शर्ट, धोतर व सोबत काठी असा पोशाख आहे. भडांगे हे गृहस्थ कुठे आढळून आल्यास पंचवटी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वृद्ध माधव भडांगे बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 01:02 IST