शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी शिवारात जुन्याच घंटागाड्या

By admin | Updated: March 2, 2017 02:08 IST

पाथर्डी फाटा परिसरातील नवीन प्रभाग क्रमांक ३१ मध्ये अजूनही जुनीच घंटागाडी फिरत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

पाथर्डी फाटा : महापालिकेतील सत्ताधारी मनसेने मोठा गाजावाजा करीत नव्या घंटागाड्यांचे उद्घाटन करून त्यांच्यामार्फत शहरातील कचरा गोळा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते; मात्र पाथर्डी फाटा परिसरातील नवीन प्रभाग क्रमांक ३१ मध्ये अजूनही जुनीच घंटागाडी फिरत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जुन्या घंटागाडीमुळे अनेक समस्याही असल्याने आता या समस्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपाच्या राजवटीत तरी सुटतील का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत नव्या घंटागाड्यांचा मुद्दा खूपच गाजला. सत्तारूढ मनसेने नव्याने २०६ घंटागाड्या रस्त्यावर आणल्याचा दावा केला. काही गाड्या रस्त्यावर धावत आहेत. शहराच्या बाह्य भागात अनेक ठिकाणी अजूनही जुन्याच घंटागाड्या फिरत आहे. पाथर्डी परिसराचाही त्याला अपवाद नाही. शहरात बहुतेक ठिकाणी नव्या घंटागाड्यांनी कचरा गोळा केला जातो आहे; मात्र पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर, प्रशांतनगरमध्ये अजूनही जुन्याच घंटागाड्या कचरा संकलनासाठी येत आहेत. त्याही वेळेवर व नियमित येत नाहीत. आल्याच तर कचरा न घेता निघून जातात. काही गल्ल्यांमधला कचरा घेतला जातो तर काही गल्ल्यांमध्ये गाडी कचरा न घेताच येऊन गेल्याचे भासवत निघून जाते. खटारा झालेल्या व ट्रॉलीचा पत्रा तुटलेल्या अवस्थेतल्या घंटागाड्या कचरा आणि दुर्गंधी पसरवत जात असल्याने त्यांच्यात कचरा टाकायला जाणेही महिलांना नकोसे वाटते. इतर ठिकाणी नव्या घंटागाड्या सुरू झाल्यात, मग वासननगर आणि प्रशांतनगरमध्येच जुन्या घंटागाड्या का, यामागे राजकारण असून जाणीवपूर्वक भेदभाव केला जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रि या महिलांनी व्यक्त केल्या आहेत. (वार्ताहर)