शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

पावसाने ओझरखेड कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 10:54 PM

चांदवड : तालुक्यातील दक्षिण पुर्व भागात शुक्रवारी (दि.८) ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओझरखेड कालवा फुटला तर पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी साचून रेल्वेचा भुयारी मार्ग बंद होऊन गावांचा संपर्क तुटला.

ठळक मुद्देचांदवड : रेल्वे अंडरपासमुळे गावांचा संपर्क तुटला !

चांदवड : तालुक्यातील दक्षिण पुर्व भागात शुक्रवारी (दि.८) ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओझरखेड कालवा फुटला तर पिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी साचून रेल्वेचा भुयारी मार्ग बंद होऊन गावांचा संपर्क तुटला.दिघवद मंडलात सुमारे ४३ मिमी पाऊस झाला तर रायपूर मंडलात अवघा सात मिमी पावसाची नोंद झाली. परिसरात वीजच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे वाहेगावसाळ जवळ ओझरखेड कालवा चारी क्रमांक ३३ जवळ फुटल्याने रेशमा खैरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने ओझरखेड कालवाबद्दल पुन्हा निकृष्ठ कामावर बोट दाखविले जात आहे.परिसरातील वाहेगावसाळ, रेडगावखुर्द, वाकी बुदरुक, काळखोडे, साळसाणो, तळेगावरोही, वडगावपंगु, रायपूर, वागदर्डी, सोनीसांगवी, काजीसांगवी, पन्हाळे, निंबाळे, गंगावे, हिवरखेडे, गणूर, दरसवाडी, विटावे या गावांना जोरदार पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन, कांदा आदी पिकाचे मोठे नुकसान झाले.दरम्यान पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या कालव्याला धरणाचे पाणी सोडले नाही तर पावसाच्या पाण्यामुळे वहन क्षमता व कामाच्या गुणवत्तेवर चर्चा होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वडगावपंगुचे विठ्ठल चव्हाण यांनी आमदार व केंद्रीय मंत्री नामदार भारती पवार यांच्याकडे केली होती. तर येवला व नांदगाव सारखे पंचनामे तात्काळ करावे अशी मागणी केल्याने तातडीने केंद्रीय आरोग्य मंत्री नामदार डॉ. भारती पवार , आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे व मान्यवरांनी भेट देऊन नुकसान ग्रस्त भागाची दौरा करुन संबधीत अधिका:यांना नुकसानीचे पंचनामे करावे असे आदेश दिले. दरम्यान वडगावपंगु जवळील रेल्वे गेट व अंडरपास पाण्याखाली गेल्याने येथील नागरीकांनी तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केंद्रीय मंत्र्याकडे केली असून याकडे तातडीने रेल्वे प्रशासनाशी बोलुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ.पवार यांनी दिले. 

टॅग्स :DamधरणRainपाऊस