गंगापूररोडवरील टपऱ्या, हातगाड्या हटविल्या
By Admin | Updated: December 23, 2014 23:57 IST2014-12-23T23:56:21+5:302014-12-23T23:57:45+5:30
गंगापूररोडवरील टपऱ्या, हातगाड्या हटविल्या

गंगापूररोडवरील टपऱ्या, हातगाड्या हटविल्या
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने मंगळवारी गंगापूररोडवर मोर्चा वळवत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या चायनीजच्या टपऱ्या, हातगाड्या तसेच अन्य साहित्य जप्त केले. पथकाने जुना गंगापूर नाका ते जेहान सर्कलपर्यंत ही मोहीम राबविली.
गंगापूररोडवर दोन्ही बाजूंनी अनधिकृतपणे चायनिजच्या गाड्या, टपऱ्या उभ्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत नागरिकांच्याही मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. महापालिकेने मंगळवारी जुना गंगापूर नाका ते जेहान सर्कलपर्यंत मोहीम राबवित नऊ चायनिजच्या गाड्या, टपऱ्या तसेच फलक जप्त केले. यावेळी विक्रेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु अतिक्रमण विभागाने धडक मोहीम राबवित संबंधितांवर कारवाई केली. (प्रतिनिधी)