शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचार्‍यांची शर्थ मतमोजणीत अव्वल : मुदतीत निकाल

By admin | Updated: May 17, 2014 00:41 IST

नाशिक : मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण त्यापाठोपाठ मतदानप्रक्रिया ते मतमोजणी अशा जवळपास तीन महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत अखेरच्या दिवशीही शासकीय यंत्रणा अव्वल ठरली. निवडणूक आयोगाने मतमोजणीचे बदललेले निकष पाहता, दुपारी चार वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहण्याची व्यक्त होणारी शंका यंत्रणेने फोल ठरवत, दुपारी साडेबारा वाजताच काम हातावेगळे करून मोकळे झाले.

नाशिक : मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण त्यापाठोपाठ मतदानप्रक्रिया ते मतमोजणी अशा जवळपास तीन महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत अखेरच्या दिवशीही शासकीय यंत्रणा अव्वल ठरली. निवडणूक आयोगाने मतमोजणीचे बदललेले निकष पाहता, दुपारी चार वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहण्याची व्यक्त होणारी शंका यंत्रणेने फोल ठरवत, दुपारी साडेबारा वाजताच काम हातावेगळे करून मोकळे झाले. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सुमारे एक हजाराहून अधिक कर्मचारी व अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. सकाळी सहा वाजताच या कर्मचार्‍यांना मतमोजणी स्थळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, तर अधिकारी वर्ग पहाटे पाच वाजताच पोहोचले होते. बरोबर आठ वाजता मतमोजणी कर्मचार्‍यांना गोपनीयतेची शपथ दिल्यानंतर मोजणीला सुरुवात झाली. क्षणाचीही उसंत न घेता, जवळपास २२ फेर्‍यांची मोजणी जलदगतीने व विना अडथळा त्यांनी चार तासांत पार पाडली. विशेष म्हणजे मतमोजणी करताना मतदान यंत्रात बिघाड अथवा ते सुरू न होण्याचे प्रकार घडण्याची धास्ती घेतलेल्या यंत्रणेला अशा प्रकारे कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागले नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासूनच यंत्रणा कामाला लागली होती. मतदार याद्यांचे पुनरीक्षण, घरोघरी जाऊन मतदारांचा शोध, फोटो ओळखपत्राचे वाटप, नवीन मतदारांची नोंद यांसारख्या विविध पातळ्यांवर काम करतानाच, मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, मतदारांना घरोघरी जाऊन मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याचे कामही यंत्रणेला करावे लागले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही जवळपास २३ हजार कर्मचार्‍यांनी लोकशाहीत आपले योगदान दिले होते. त्यानंतर मात्र मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी २२ दिवसांचा कालावधी हाती असला तरी, मतपेट्यांची सुरक्षितता, मोजणीची व्यवस्था या सार्‍या बाबींची पूर्तता करतानाच दररोज स्ट्रॉँग रूमला हजेरी लावण्याचा दंडकही अधिकार्‍यांनी पाळला. या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी विलास पाटील, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, रघुनाथ गावडे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ, नीलेश जाधव, वासंती माळी, रत्नमाला चौरे, तहसीलदार गणेश राठोड, सुचेता भामरे आदिंनी जातीने लक्ष ठेवले. बारा वाजता मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून या अधिकार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला व मुदतीपूर्व निवडणुकीचा निकाल लावला.