शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी वीज कंपनी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST

मालेगावी वीज कंपनी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

मालेगाव कॅम्प : गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात वीज कंपनीतर्फे केल्या जाणाऱ्या वाढीव भारनियमनाच्या निषेधार्थ वीज कंपनीच्या मोतीभवन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भारनियमन प्रमाण कमी करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता एस. एस. आडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वाढीव भारनियमनामुळे शहरातील यंत्रमागासह इतर उद्योग व्यवसायावर दुष्परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बारा बंगला भागातील वीज कंपनीच्या मोतीभवन या मुख्य कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तेथे मोर्चाचे छोटेखानी सभेत रुपांतर झाले. शहरातील परिस्थिती व आगामी सण-उत्सव लक्षात घेता वाढीव भारनियमन रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सदर आंदोलन अचानक करण्यात आले. वीज कंपनीचे मुख्य अभियंता एस. एस. आडे हे ग्रामीण भागात दौऱ्यावर गेले असल्याने ते लागलीच आंदोलनस्थळी उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ संतप्त भावना उमटल्या. तब्बल दोन अडीच तासांनंतर अभियंता आडे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन शहरातील कंपनीच्या ग्रुप जी३ ऐवजी ग्रुप ई प्रमाणे कमी प्रमाणात भारनियमन करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मालेगाव शहर कॉँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार शेख रशीद, उपमहापौर जमिल अन्सारी, गाझी अमानुल्ला खान, विठ्ठल बर्वे आदिंची यासंदर्भात भाषणे झाली.या आंदोलनात मनपा स्थायी समिती सभापती अस्लम अन्सारी, माजी स्थायी सभापती इरफान अली, साबीर गौहर, शकील बेग, एजाज वजीर, हाफीज अन्सारी, मोहंमद सुलतान, नवीद खतीब आदि कॉँग्रेस कार्यकर्ते - पदाधिकारी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)