होम क्वॉरंटाइन असतानाही भटकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:51 IST2020-03-26T23:51:29+5:302020-03-26T23:51:42+5:30
नेपाळमधून भारतात आलेल्या आणि १४ दिवस होम कॉरण्टाइन असतानाही शहरात फिरत असलेल्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.

होम क्वॉरंटाइन असतानाही भटकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : नेपाळमधून भारतात आलेल्या आणि १४ दिवस होम कॉरण्टाइन असतानाही शहरात फिरत असलेल्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय अधिकारी सपना ठाकरे यांनी पोलिसात फिर्याद दिली. सदर इसम हा नेपाळमधून भारतात आला होता. त्यास कोरोना संशयित म्हणून
१४ दिवस घरात कॉरण्टाइन केले असताना तो सोयगावच्या गिरणा स्टील परिसरात फिरताना आढळून आला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.