शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरच्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:22 IST

नाशिक : माहेरून पाच लाख रुपये आणत नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पतीसह सासरकडील मंडळींकडून गत सहा वर्षांपासून सुरू असलेला शारीरिक व मानसिक त्रासामुळेच मुलगी माधुरी सागर पानगव्हाणे हिने आत्महत्या केल्याची फिर्याद सोमनाथ पगार यांनी पोलिसात दिली आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पतीसह सासरच्यांविरोधात आत्महत्सेय प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे़

ठळक मुद्देभद्रकाली पोलिस ; पतीसह सासरच्यांना अटक

नाशिक : माहेरून पाच लाख रुपये आणत नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पतीसह सासरकडील मंडळींकडून गत सहा वर्षांपासून सुरू असलेला शारीरिक व मानसिक त्रासामुळेच मुलगी माधुरी सागर पानगव्हाणे हिने आत्महत्या केल्याची फिर्याद सोमनाथ पगार यांनी पोलिसात दिली आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पतीसह सासरच्यांविरोधात आत्महत्सेय प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे़

सोमनाथ पगार (रा़ खडकजांब, ता़ चांदवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी माधुरी हिचा विवाह सागर रमेश पानगव्हाणे (रा़ छपरा निवास, जिल्हा परिषदेसमोर, नाशिक) सोबत झालेला होता़ पती सागर पानगव्हाणे, जेठ प्रविण पानगव्हाणे, सासरे रमेश पागनव्हाणे व सासू अलका पानगव्हाणे हे रिकामे झालेल्या गाळ्यांची दुरुस्तीसाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची २०१२ पासून सतत मागणी करीत होते़ मात्र पैसे न दिल्याने किरकोळ कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण व शारीरिक, मानसिक छळ करीत होते़ या त्रासामुळे कंटाळलेल्या माधुरीने २० डिसेंबर रोजी राहत्या घरासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली़

मुलीला आत्महत्येस करण्यासाठी पती व सासकडील मंडलींनीच प्रवृत्त केल्याचे पगार यांनी फिर्यादीत म्हटले आहे़सराफ बाजारातून दागिण्यांची चोरीनाशिक : महिलेची पर्स कापून त्यातील ६० हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे वळे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सराफ बाजारात घडली आहे़ डिसोझा कॉलनीतील सुनील प्रधान या १४ डिसेंबर रोजी दुपारी सराफ बाजार येथे गेल्या होत्या़ या ठिकाणी चोरट्यांनी त्यांची पसृ काढून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़वडाळारोड परिसरातील मुलीचे अपहरणनाशिक : वडाळा रोडवरील जेएमसीटी महाविद्यालयाजवळील दीपालीनगरमधील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि़२५) घडली़ या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे़महागड्या सायकलची चोरीनाशिक : देवळाली कॅम्पमधील रेजिमेंट लाईनमधील रहिवासी राहुल दुबे यांची १६ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची फायर फॉक्स कंपनीची रेजंर गियर सायकल चोरट्यांनी सोमवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास चोरून नेली़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़घरफोडीत सोन्याच्या दागिण्यांची चोरीनाशिक : घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५९ हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १६ व १७ डिसेंबर या कालावधीत जेलरोड परिसरात घडली आहे़ या प्रकरणी प्रेमकुमार बावा (२९, समर्पण बंगला, अयोध्यानगर, सायट्रीक) यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे़किरकोळ कारणावरून विवाहितेचा छळनाशिक : घरातील कामावरून कुरापत काढून गत चार वर्षांपासून पतीसह सासरकडील मंडळी शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून शारीरीक व मानसिक छळ केला असून विवाहातील दागिण्यांचा अपहार केल्याची फिर्याद विवाहितेने आडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी आडगाव पोलिसांनी पती प्रविण चव्हाण, त्र्यंबक चव्हाण (सासरे), शांती चव्हाण (सासू), नणंद - मानसी गडकर, सपना जाधव (रा़ वडाळीभोई, ता़चांदवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस