शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ओढा, कोटमगाव ग्रामपंचायतींनी साधले जनहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 23:21 IST

नाशिक : गाव करी ते राव काय करी असे म्हटले जात असले तरी, त्याची प्रचिती नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतीने दिली आहे. केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतींनी जनहिताचे उल्लेखनीय कामे केली असून, त्याचीच दखल घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कचरामुक्त गाव, स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या उपाययोजना व ग्रामपंचायतीतील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न अन्य ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत आहेत.

ठळक मुद्देगाव करील ते राव काय करील : दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गाव करी ते राव काय करी असे म्हटले जात असले तरी, त्याची प्रचिती नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतीने दिली आहे. केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतींनी जनहिताचे उल्लेखनीय कामे केली असून, त्याचीच दखल घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कचरामुक्त गाव, स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या उपाययोजना व ग्रामपंचायतीतील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न अन्य ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत आहेत.ओढा ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३३२१ इतकी असून, गावाच्या विकासासाठी ग्राम विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. गावात उल्लेखनीय कामकाजात प्रामुख्याने १०० टक्के भूमिगत गटार बांधकाम, कचरामुक्त गाव, ग्रामपंचायतमार्फत आरोग्य केंद्रामध्ये सॅनेटरी पॅड वेंडिग मशीन बसविण्यात आले असून, जलसंधारणांतर्गत गावातील पाझर तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या संगणकीकरणांतर्गत सोशल मीडियाचा वापर करण्यात येत असून, बायोगॅस संयंत्र, गावातील सर्व नागरिकांना पाणी शुद्धीकरण केंद्रामधून पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाण्याचा लाभ, डिजिटल शिक्षणांतर्गत अंगणवाडी व प्राथमिक शाळेस संगणक व प्रोजक्टर, दर शनिवारी भरणाºया आठवडे बाजार तळासाठी ओटे, उत्पन्न वाढीकरिता बहुउद्देशीय इमारत बांधण्यात आली आहे.ग्रामपंचायतीने केलेल्या याकामांची दखल घेत यापूर्वी ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार’देखील मिळाला असून, याकामी सरपंच विष्णू रामभाऊ पेखळे, उपसरपंच शशिकांत सहाणे व ग्रामसेवक दौलत पांडुरंग गांगुर्डे यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. ग्रामपंचायतीने विकासकामे करून केला गावाचा कायापालट कोटमगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या १५७५ असून, गावाचा कायापालट करताना अनेक कामे करण्यात आली आहेत. त्यात गावात वृक्षलागवड, जलशुद्धीकरण केंद्र, डिजिटल शाळा व अंगणवाडी, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम, गावातील महिला, मुलींसाठी सॅनिटरी पॅड वितरण व विल्हेवाट मशीन, कुपोषित बालकांसाठी नियमित आरोग्य चाचणी आदी योजना राबविण्यात आल्या आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी केलेल्या कामांची दखल घेत ‘निर्मलग्राम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सरपंच बाळकृष्ण म्हस्के उपसरपंच समाधान रंगनाथ जाधव व ग्रामसेवक बाळासाहेब कदम यांनी याकामी विशेष कामगिरी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत