ओबीसींचे ‘पाटी लावा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:45 IST2021-02-08T19:46:08+5:302021-02-09T00:45:13+5:30

सिन्नर : अखिल भारतीय ओबीसी महासभा, नाशिक जिल्हा मेळावा हजारो ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत सिन्नर येथे झाला. तालुकाध्यक्ष व उर्वरित कार्यकारिणी निवड व नियुक्तीपत्र देऊन ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत ‘पाटी लावा’ अभियान सुरू करण्यात आले.

OBC's 'Pati Lava' campaign | ओबीसींचे ‘पाटी लावा’ अभियान

ओबीसींचे ‘पाटी लावा’ अभियान

ठळक मुद्देसिन्नर: जिल्हास्तरीय मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा

नाशिक विभागीय अध्यक्ष गौरव वाघ, जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ आखाडे, महिला जिल्हाध्यक्ष विद्या घायतड, विभागीय उपाध्यक्ष प्रतीक राजपूत, जिल्हा मार्गदर्शक भास्कर घायतड, जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाटजिरे, नवनियुक्त तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुदीप पाटील आदींनी ओबीसी बांधवांच्या समस्या, अडीअडचणी समजावून घेतल्या. ओबीसी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सरकार करत नसलेल्या जनगणनेबाबत प्रशासकीय स्तरावर येत असलेल्या अडचणींचा पाढा ओबीसी बांधावांनी पदाधिकाऱ्यांसमोर वाचला. आंदोलन व मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन, अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली.

Web Title: OBC's 'Pati Lava' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.