शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

संशयित डेंग्यू रुग्णांच्या संख्येने द्विशतक गाठले

By admin | Updated: November 18, 2014 00:59 IST

संशयित डेंग्यू रुग्णांच्या संख्येने द्विशतक गाठले

नाशिक : शहरात डेंग्यूचा त्रास वाढतच असून, चालू महिन्याच्या पंधरवाड्यातच तब्बल ८२ रुग्ण आढळले आहे, तर संशयित डेंग्यू रुग्णांच्या संख्येने द्विशतक गाठले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले. त्यानंतर महापालिकेने ही सर्वसाधारण संख्या असल्याचे सुरुवातीला म्हटले होते. परंतु गेल्या महिन्यांत तब्बल १०० जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर मनसे नगरसेवक अर्चना जाधव यांचे पती संजय जाधव यांच्यासह किमान पाच ते सहा संशयित डेंग्यू रुग्णांचे बळी गेले आहेत; परंतु महापालिका ते मान्य करायला तयार नाही. पालिकेकडे खासगी वैद्यकीय व्यावसायिक माहिती देत नाहीत, अशी पालिकेची तक्रार होती; परंतु आता खासगी वैद्यकीय व्यावसायिकदेखील पालिकेकडे माहिती पुरवत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत म्हणजेच १ ते १५ डिसेंबरपर्यंत संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या २११पर्यंत गेली असून, तितके नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १७७ रक्तनमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ८२ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील ७१ रुग्ण पालिका हद्दीतील आहेत, तर ११ रुग्ण बाहेरील असल्याचा दावा पालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे. जानेवारीपासून १५ नोव्हेंबरपर्यंत आत्तापर्यंत ६९७ संशयित रुग्णांचे रक्तनमुने जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३१८ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस पावसाळा संपल्याने डेंग्यू रुग्णांची संख्या घटण्याची शक्यता होती; परंतु ही संख्या वाढतच असल्याने प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पालिकेने त्वरित दखल घेऊन आवश्यक ती रोगप्रतिबंधक उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)