शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीत साधूंची संख्या होणार दुप्पट

By admin | Updated: September 11, 2015 23:46 IST

रविवारी सोहळा : निर्मोही आखाडा राहणार पहिल्या क्रमांकावर

नाशिक : पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे शाही मिरवणूक पाहण्यास मुकलेल्या भाविकांसाठी रविवारी (दि. १३) सकाळी पुन्हा हा शाही थाट पाहण्याची संधी आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या द्वितीय शाहीस्नानानिमित्त रविवारी सकाळी ही मिरवणूक निघणार असून, फुलांनी सुशोभित केलेले रथ, उंट-घोड्यांवर विराजमान साधू-महंत, श्री महंत-महंतांची सहाशेहून अधिक वाहने, भजन-संकीर्तन करणारे पन्नास हजारांहून अधिक साधू... डोळ्यांचे पारणे फेडणारे मर्दानी खेळ असा लवाजमा नाशिककरांना अनुभवता येणार आहे. यावेळी तिन्ही आखाड्यांच्या खालशांत वाढ झाल्याने तसेच साधूंचे मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने गेल्या मिरवणुकीच्या तुलनेत रविवारी साधूंची संख्या दुपटीने वाढणार असल्याचे प्रमुख आखाड्यांकडून सांगण्यात आले. कुंभमेळ्यात साधूंच्या शाहीस्नानाइतकेच आकर्षण असते ते स्नानापूर्वी निघणाऱ्या शाही मिरवणुकीचे. नाशिकमधील साधुग्राम निवासी वैष्णवपंथीय साधूंचे आखाडे इष्टदेवतांना घेऊन मिरवणुकीने एकापाठोपाठ शाहीस्नानासाठी पवित्र रामकुंडाकडे रवाना होतात. साधूंच्या शौर्य व वैभवाची साक्ष देणाऱ्या या मिरवणुकीला ‘शाही मिरवणूक’ म्हटले जाते. गेल्या २९ आॅगस्ट रोजी कुंभमेळ्याच्या प्रथम पर्वणीला शहरातून शाही मिरवणूक निघाली खरी; मात्र पोलिसांच्या बॅरिकेडिंगमुळे भाविकांना ती डोळ्यांत साठवता आली नव्हता. त्यामुळे यंदा पोलिसांंनी बंदोबस्ताचे फेरनियोजन करीत मिरवणूक सर्वांना पाहता येईल, अशी ग्वाही दिली आहे. तथापि, त्यात कितपत तथ्य आहे, हे प्रत्यक्ष मिरवणुकीच्या वेळीच समजणार आहे. प्रथम शाहीस्नानाच्या वेळी शाही मिरवणुकीत निर्वाणी अनी, दिगंबर अनी व निर्मोही अनी असा आखाड्यांचा क्रम होता. यावेळी त्यात बदल होणार असून, आता निर्मोही अनी आखाडा पहिल्या क्रमांकावर राहील, तर निर्वाणी अनी आखाडा तिसऱ्या क्रमांकावर राहणार असून, दिगंबर अनी आखाडा मध्यमागी राहणार आहे. रविवारी पहाटे साधू स्नान करून इष्टदेवतांसह मिरवणुकीत सहभागी होतील. साधुग्राममधील लक्ष्मीनारायण मंदिरापासून सकाळी ६ वाजता निर्मोही अनी आखाड्याची मिरवणूक निघेल. ६.३० वाजता दिगंबर अनी, तर ७ वाजता निर्वाणी अनीच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल. प्रत्येक आखाड्याच्या मिरवणुकीत दोनशे मीटरचे अंतर राहणार आहे. लक्ष्मीनारायण मंदिर, काट्या मारुती पोलीस चौकी, गणेशवाडी देवी चौक, पंचवटी आयुर्वेदिक कॉलेज, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, सरदार चौक या मार्गे मिरवणूक रामकुंडावर पोहोचेल. तेथे निशाण व इष्टदेवतेचे विधिवत पूजन केले जाईल. इष्टदेवता हनुमानाला स्नान घातले जाईल. त्यानंतर आखाड्याच्या प्रमुख श्री महंतांचे व नंतर साधूंचे स्नान होईल. स्नानानंतर ज्या क्रमाने आखाडे दाखल झाले, त्याच क्रमाने ते परतीच्या मार्गाने साधुग्रामकडे रवाना होतील. दरम्यान, शाही मिरवणुकीची साधुग्राममध्ये जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

खालशांच्या संख्येत वाढवैष्णव पंथातील तिन्ही अनी आखाड्यांच्या खालशांची संख्या ६३७ इतकी होती. त्यांत दिगंबर अनीच्या ४0५, निर्वाणी अनीच्या १६२, तर निर्मोही अनीच्या ६0 खालशांचा समावेश होता; मात्र प्रथम शाहीस्नानानंतर साधुग्राममध्ये महंताई समारंभांनंतर खालशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता दिगंबर अनीचे ४५0, निर्वाणी अनीचे १७५, तर निर्मोही अनीचे खालसे ७२ वर पोहोचले आहेत. असे असेल मिरवणुकीचे स्वरूपप्रारंभी आखाड्याचा फलक, त्यामागे बॅण्डपथक, निशाण व इष्टदेवता, त्यानंतर श्री महंतांचा रथ, आखाड्याचे महंत, त्यानंतर खालशांचे वाहन व त्या-त्या खालशातील महामंडलेश्‍वर, साधू अशी प्रत्येक आखाड्याची मिरवणुकीतील रचना राहणार असून, तिन्ही आखाडे एकापाठोपाठ याच रचनेनुसार मार्गक्रमण करतील.