शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

भटक्या श्वानाच्या पिल्लावर हल्ला भोवला; म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 5:18 PM

श्वानाचे इवलेसे पिल्लू सोसायटीच्या जिन्यात आले, म्हणून एका इसमाने चक्क लोखंडी गजाने त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्या पिल्लाचा जीव सुदैवाने वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाला असून कदाचित नंतर मृत्यूमुखीही पडला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देप्राणी संरक्षण कायद्यांतर्गत क्रूरता निवारण अधिनियमान्वये फिर्याद मारहाण करतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

नाशिक : कायद्याने केवळ मानवालाच संरक्षण दिले आहे, असा गैरसमज अनेकदा काही माणसांचा होतो, आणि त्यामुळे त्यांच्याकडून माणुसकीलाच लाजवेल असे कृत्य केले जाते. मखमलाबाद शिवारात असाच काहीसा प्रकार स्वत:ला ‘माणुस’ म्हणविणाऱ्या एकाने केला. श्वानाचे इवलेसे पिल्लू सोसायटीच्या जिन्यात आले, म्हणून एका इसमाने चक्क लोखंडी गजाने त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्या पिल्लाचा जीव सुदैवाने वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाला असून कदाचित नंतर मृत्यूमुखीही पडला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी प्राणीप्रेमींनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्राणीप्रेमी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरूध्द प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत क्रूरता निवारण अधिनियमान्वये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित संशयित भरत नेरकरविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडाकॉर्नरवरील विसे मळा येथे राहणाºया शरण्या शशिकांत शेट्टी यांनी संशयित नेरकरविरूध्द फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द प्राण्यांना क्रूरतेने वागविल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राण्यांवर माणसाने हल्ला करत विनाकारण त्यांना क्रूरतेने वागविणे कायद्याने गुन्हा ठरतो. मुक्या जीवांच्या संरक्षणासाठी वाचाशक्ती प्राप्त असलेल्या मनुष्यप्राण्याने नेहमी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.इको-एको, शरण या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा, त्यांनी त्या श्वानाच्या पिल्लाला रेस्क्यू करण्यासाठी धाव घेतली. यावेळी प्राणीप्रेमींनी परिसरात शोध घेतला; मात्र पिल्लू प्राणीप्रेमींना आढळून आले नाही. नागरिकांना त्यांनी माहिती दिली असून कुठे दिसल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शरण्या शेट्टी, सुखदा गायधनी, देविका भागवत, राहूल कुलकर्णी, सागर पाटील यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित नेरकरविरूध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे. प्राणीप्रेमींनी पिल्लाला मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेजचा पुरावाही पोलिसांना सोपविला आहे.---पुरावा प्राप्त झाला आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागविल्याच्या घटना यापुर्वीही घटना घडल्या आहेत; मात्र त्याविषयी कोणी नागरिक पुढाकार घेत नाही. मारहाण करतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे.- शरण्या शेट्टी, फिर्यादी---पोलिस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दिली आहे; मात्र प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याबाबत प्रतिबंध घालणारा १९६० सालच्या कायद्यात काळानुरूप तरतुदी होणे आवश्यक आहे. कारण कायद्यात मोठ्या स्वरूपाची दंडात्मक कारवाईची तरतुद असली पाहिजे. सरकारने त्यासंदर्भात पावले उचलण्याची गरज आहे.- सुखदा गायधनी, प्राणीप्रेमी

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारPoliceपोलिसNashikनाशिकdogकुत्रा