Now there is a possibility of a shortage of fab flu | आता फॅबिफ्लूची टंचाई  निर्माण होण्याची शक्यता

आता फॅबिफ्लूची टंचाई  निर्माण होण्याची शक्यता

नाशिक : शहरात रेमेडीसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन यांची टंचाई असतानाच प्राथमिक अवस्थेतील कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या फॅबिफ्लू या गोळीचीही टंचाई निर्माण  होण्याच्या मार्गावर आहे. 
शहरातील मोजक्याच एजन्सीकडे या गोळ्या उपलब्ध  असल्याने  मेडिकल दुकानदारांना पुरवुन पुरवुन या गोळ्यांचे पाकीट दिले जात आहे. बहुतेक दुकानदार १०० ते २०० स्ट्रीपची मागणी नोंदवतात तेव्हा त्यांना १० ते २० स्ट्रीप मिळतात.  निर्मिती कमी होत असल्यामूळे दुकानदारांनाही यासाठी दरराेज पाठपुरावा करावा लागत असून सर्वांना माल पुरविणे एजन्सीला जिकीरिचे झाले आहे. 
ज्या रुग्णाला कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसली आणि ज्यांचा एचआरसीटी स्कोर पाचच्या आत आहे अशा रुग्णांना ही  गोळी दिली जात असून या गोळ्यांचा डोस पूर्ण केला तर कोरोना आटोक्यात येत असल्याने शहरातील बहुसंख्य खासगी डॉक्टर या गोळीची शिफारस करतात. शहरात या गोळीच्या आठ ते दहा एजन्सी आहेत यापुर्वी सर्व एजन्सींकडे मुबलक माल येत असल्याने सर्व मेडिकल दुकानदारांना पर्यायाने रुग्णांना या गोळ्या उपलब्ध होत होत्या. 

Web Title: Now there is a possibility of a shortage of fab flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.