शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ग्रंथपालांना आता पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: March 6, 2015 01:41 IST

राज्यातील ग्रंथपालांना आता पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा मार्ग मोकळा

नाशिक : राज्यातील माध्यमिक शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यासंदर्भात राज्य शासनाने सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राज्यातील ग्रंथपालांना आता पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यातील पदवीधर ग्रंथपालांना त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदवीधर वेतनश्रेणीच लागू करावी, यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. यापैकी सचिन दिवेकर यांच्यासह काही ग्रंथपालांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य शासनाने सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली होती. गेल्या वर्षी २४ जानेवारीस सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यानंतरही राज्य शासनाने त्याची दखल न घेता गेल्या वर्षीच ८ मार्च रोजी पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. परंतु सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापासून ३० दिवसांच्या आत याचिका दाखल करण्यासाठी मुदत असताना राज्य शासनाने ४१ दिवसांनी याचिका दाखल केल्याने ती २६ फेब्रुवारी याचिका फेटाळली आहे. ग्रंथपालांना पदवीधर म्हणजेच बी.एड. समकक्ष वेतनश्रेणी मिळावी यासाठी आत्तापर्यंत २२५ ग्रंथपालांच्या बाजूने उच्च न्यायालयाने निर्णय दिले होते. परंतु तरीही राज्य शासनाने टाळाटाळ केल्यामुळे गेल्या काही वर्षांत उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर अशा तीन खंडपीठांत ७० अवमान याचिका सरकारच्या विरोधात दाखल आहेत. या अवमान याचिकांमध्ये राज्य शासनाने पदवीधर श्रेणी लागू झाल्यानंतर द्यावा लागणाऱ्या फरकावर १२ टक्के व्याजाची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शासनाची याचिका फेटाळल्याने आता ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.