प्रमाणपत्रासाठी आता आॅनलाइन अपॉइंटमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:11 IST2018-04-18T00:11:21+5:302018-04-18T00:11:21+5:30
मालेगाव : मोटार वाहन कायद्यानुसार व्यावसायिक संवर्गातील रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रॅक्टर आदी वाहनांना दरवर्षी परिवहन कार्यालयात यांत्रिक तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

प्रमाणपत्रासाठी आता आॅनलाइन अपॉइंटमेंट
मालेगाव : मोटार वाहन कायद्यानुसार व्यावसायिक संवर्गातील रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रॅक्टर आदी वाहनांना दरवर्षी परिवहन कार्यालयात यांत्रिक तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेले वाहन रस्त्यावर आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १८ एप्रिलपासून योग्यता प्रमाणपत्र नूतनी- करणासाठी शासनाचे संकेतस्थळ ६६६.स्रं१्र५ंँंल्ल.ॅङ्म५.्रल्ल यावर आॅनलाइन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे.