शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

त्या नोटिसा नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 10:44 PM

नाशिक : राज्य शासनाच्या निर्देशानुसार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शहरातील प्रत्येक भागाचा सिटी सर्व्हे करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांना ह्यप्रॉपर्टी कार्डह्ण उपलब्ध करून देण्यासाठीच नागरिकांकडून त्यांच्या घरांचे खरेदी खत, सातबारा, एन ए प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. त्यामुळे नोटिसांबद्दल कोणताही गैरसमज करून न घेता नागरिकांनी त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे भूमी अभिलेखच्या पंडित कॉलनीतील कार्यालयात जमा करून स्वत:च्या मालमत्तेचे कायमस्वरूपी दस्तऐवज तयार करुन घ्यावेत, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाच्या विशेष उपअधीक्षक रोहिणी दहीफळे यांनी केले आहे.

ठळक मुद्देरोहिणी दहीफळे : भूमी अभिलेखच्या विशेष उपअधीक्षकांची माहिती

नाशिक : राज्य शासनाच्या निर्देशानुसार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शहरातील प्रत्येक भागाचा सिटी सर्व्हे करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांना ह्यप्रॉपर्टी कार्डह्ण उपलब्ध करून देण्यासाठीच नागरिकांकडून त्यांच्या घरांचे खरेदी खत, सातबारा, एन ए प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. त्यामुळे नोटिसांबद्दल कोणताही गैरसमज करून न घेता नागरिकांनी त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे भूमी अभिलेखच्या पंडित कॉलनीतील कार्यालयात जमा करून स्वत:च्या मालमत्तेचे कायमस्वरूपी दस्तऐवज तयार करुन घ्यावेत, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाच्या विशेष उपअधीक्षक रोहिणी दहीफळे यांनी केले आहे.              महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १०२ अन्वये ज्यांच्या नावावर घरांची मालमत्ता आहे, त्या मालमत्तांची चौकशी करून त्यांचे दस्तऐवजीकरण करणे तसेच संबंधित नागरिकांना त्या कागदपत्र पडताळणीनंतर त्या मालमत्तेचे प्रॉपर्टीकार्ड देणे ही नियमित प्रक्रिया आहे. नाशिकमध्ये भूमापनची तीन कार्यालये असून त्या माध्यमातून सध्या द्वारका आणि इंदिरानगरच्या परिसरातील नागरिकांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

         त्यामुळे नोटीस ही नागरिकांच्या मालमत्तेचे प्रॉपर्टीकार्ड करून देण्यासाठीच असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता लवकरात लवकर कागदपत्रे दाखल करावीत. भविष्यात सर्व मालमत्तांचे सातबारा बंद होऊन केवळ सिटी सर्व्हेचे प्रॉपर्टीकार्डच मिळकत पत्रिका म्हणून नागरिकांना जपून ठेवले तरी पुरेसे होणार आहे.

त्यामुळे भविष्यासाठीची तरतूद म्हणून नागरिकांनी त्यांची कागदपत्रे सादर करून प्रॉपर्टी कार्ड मिळवावे, असे आवाहन देखील दहीफळे यांनी केले आहे. येत्या वर्षभरात गावठाणवगळता शहरातील सर्व भागांना अशा प्रकारच्या नोटिसा देऊन त्यांना प्रॉपर्टीकार्ड करून घेण्यासाठी सूचीत केले जाणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक