शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

धडा न घेतल्यानेच २००८ मधील महापुराची पुनरावृत्ती!

By संजय पाठक | Published: August 12, 2019 2:02 AM

२००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापूर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. पुरातून सावरत नाही तर पूररेषा नावाचे महासंकट उभे राहिले.

ठळक मुद्देनदीपात्रांचा संकोच कायम पुराची तीव्रता कमी करण्याचे उपाय कागदावरच

नाशिक : २००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापूर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. पुरातून सावरत नाही तर पूररेषा नावाचे महासंकट उभे राहिले. कोट्यवधी रुपयांच्या मिळकती त्यात अडकल्या. मग पूर आणि पूररेषा या दोन्ही संकटांतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याचे ठरले. त्यातून पूर प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे अहवाल तयार झाले. परंतु दहा वर्षांत त्यातील कोणतीही गोष्ट पुढे गेली नाही. परिणामी यंदा २००८ च्या पुराची आठवण होणे हे स्वाभाविकच होते.नाशिककरांच्या दृष्टीने तसा गोदाकाठी येणारा पूर नवा नाही. मात्र, २००८ मध्ये आलेला महापूर हा १९६९ मधील पुराची आठवण करून देणारा होता. १९६९चा महापूर निसर्गनिर्मित्त होता. तर २००८ मध्ये आलेला पुराला मानवनिर्मित होता. कोणत्याही नियोजनाशिवाय अचानक पाण्याचा विसर्ग केल्याने हा पूर आला होता. गोदाकाठी येणारा पूर नवा नसला तरी गंगापूररोडवरील सावरकरनगरपासून होळकर पुलापर्यंतचा सर्वच भाग बाधीत झाला. नासर्डी, वाघाडी आणि नंदिनी या नद्यांनादेखील महापूर आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. त्यामुळे १९ सप्टेंबर रोजी महापालिकेची महासभा सुरू असतानाच गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला असून, गंगापूररोडचा भाग पाण्यात गेला आहे असे निरोप येताच धावपळ झाली. त्यानंतर पुराने वेढलेल्या नागरिकांचे बचाव कार्य झाले आणि पूर ओसरला.पूर ओसरला परंतु नव्या समस्यांचा महापूर आला. गोदापात्रातील अतिक्रमणे त्याकडे होणारे दुर्लक्ष हा विषय प्रामुख्याने चर्चेत आला, परंतु त्याचबरोबर महापालिकेचा विकास आराखडा १९८९ मध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर तो १९९३ ते ९५ असा टप्प्याटप्प्याने मंजूर झाला. या दरम्यान गोदाकाठी एक सुरक्षिततेची रेषा होती तीच नाहीशी करण्याचे कुटील कारस्थान यशस्वी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता २००८ ची पुनरावृत्ती नको म्हणून काळजी वाहू लागली आणि त्यातून जलसंपदा विभागाच्या वतीने पूररेषा आखण्यासाठी जबाबदारी देण्यात आली. परंतु ही पूररेषा म्हणजे भलतीच आपत्ती ठरल्याचा अनेकांचा रोष आहे.दहा वर्षांपासून कारवाई शून्यपूररेषेची नव्हे खरे तर पुराची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राने उपाययोजना सुचवल्या. परंतु दहा वर्षे यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे २००८ सालच्या पुराची पुनरावृत्ती नाशिककरांनी अनुभवली.४पूररेषेतील सर्व अडथळे जैसे थे आहेत. मग पूर येणार नाही तर काय होणार? यंदा नियोजनपूर्वक गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आला हा एक भाग पथ्यावर पडला आणि पुरामुळे जीवितहानी झाली नाही. तथापि, मिळकतींचे नुकसान टाळता आले नाही हे विसरून कसे चालेल ?

टॅग्स :NashikनाशिकNashik Floodनाशिक पूर