शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

नामको निवडणुकीत ३६.२१ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 1:16 AM

नाशिक : जिल्ह्यातील सहकार क्षेत्र घुसळून टाकणाऱ्या नाशिक मर्चंट को -आॅप. बॅँकेच्या निवडणुकीच्या संचालकपदासाठी इच्छुक उमेदवारांचा प्रचंड उत्साह असला ...

नाशिक : जिल्ह्यातील सहकार क्षेत्र घुसळून टाकणाऱ्या नाशिक मर्चंट को -आॅप. बॅँकेच्या निवडणुकीच्या संचालकपदासाठी इच्छुक उमेदवारांचा प्रचंड उत्साह असला तरी मतदारांचा मात्र निरुत्साह दिसून आला. बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या या बॅँकेसाठी सुमारे ३६.२१ टक्के मतदान झाले. कमी मतदान सर्वच पॅनलमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे असले तरी पारंपरिक मतदानाच्या आधारे सर्वच पॅनलने विजयाचा दावा केला आहे. येत्या बुधवारी (दि.२६) या बॅँकेच्या चाव्या कोणाच्या हाती असणार हे स्पष्ट होणार आहे.गेले पाच वर्षे प्रशासकीय राजवट हटणार असून, बॅँकेच्या सर्वच इच्छुकांमध्ये उत्साह होता. प्रगती, सहकार व नम्रता या तीन पॅनलमध्ये त्यामुळेच चुरशीची लढत होत असल्याचे दिसत होते. तथापि, मतदारांत उत्साह दिसून आला नाही. ग्रामीण भागात काही प्रमाणात पॅनल टू पॅनल मतदान झाल्याचे सांगण्यात येते. मिश्र प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जाते.  तथापि, शहरात मात्र क्रॉस व्होटिंग झाले असून उमेदवार बघून मतदान झाल्याने निकालाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.बॅँकेच्या २१ जागांसाठी एकूण ८२ उमेदवार असून बहुतांशी उमेदवार नाशिक जिल्ह्णातीलच आहे. उत्तर महाराष्टÑासह अन्य जिल्ह्णांत आणि राज्यात एकूण ३१० मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांचे बूथ उभारण्यात आले होते आणि कार्यकर्त्यांची गर्दी होती. तथापि, थंडीमुळे मतदार मात्र सकाळी बाहेर पडले नाही. पहिल्या दोन ते चार तासांत तर अनेक ठिकाणी उमेदवार मतदारांच्या प्रतीक्षेत होते. नऊ ते दहा वाजेनंतर उमेदवारांचा प्रतिसाद काहीसा वाढला आणि दुपारी बारा वाजेपर्यंत २२ हजार १७६ मतदारांनी मतदान केले. म्हणजे १२.५८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी आणि टक्का वाढला आणि दोन वाजेपर्यंत एकूण २१.३२ टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी ३६.२१ टक्के मतदान झाले होते. १,७६,२६२ मतदारांपैकी ६३,८३९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला.या निवडणुकीत बोगस मतदान टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. विशेषत: यापूर्वी बॅँकेचे सभासद ओळखपत्रदेखील चालत असले तरी यंदा ओळखपत्र नसेल तरी चालेल परंतु मतदान क्रमांकाबरोबरच सार्वत्रिक निवडणुकीत चालणारी शासकीय ओळखपत्रांची पडताळणी करूनच मतदान करू दिले जात होते. तथापि, यामुळे मोठ्या प्रमाणात बोगस मतदान टळल्याचा दावादेखील निवडणूक अधिकाºयांनी केला आहे.दोघा पॅनल नेत्यांची प्रतिष्ठापणाला..या निवडणुकीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे बॅँकेच्या सत्तेच्या माध्यमातून आगामी राजकीयदृष्ट्या स्वत:चे स्थान बळकट करून घेण्यासारखे आहे. विशेष करून नाशिक मध्य मतदारसंघातील विजयाची गणिते बहुतांशी मर्चंट बॅँकेच्या माध्यमातून सोपे होणार असल्यामुळे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार वसंत गिते तसेच राष्टÑवादीचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलार इच्छुक या दोघांनी स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरविले आहे. दोन्हीही नेते या निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांनी प्रतिष्ठापणाला लावल्याचे दिसून आले.मुंबईत दुपारपर्यंत अवघे ८० मतदानमुंबईत दादर येथे बॅँकेची शाखा असून त्याच ठिकाणी ७५१ मतदारांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. तथापि, दुपारी तीन वाजेपर्यंत या केंद्रावर अवघे ८० मतदान झाले होते. या शाखेतील बहुतांशी सभासद नवी मुंबईत राहतात. त्यामुळे रविवारी सुटीच्या दिवशी खास बॅँकेत जाऊन मतदान करण्यात कोणी स्वारस्य दाखवले नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकbankबँकNashikनाशिक