शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

निसाका कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही

By admin | Updated: January 19, 2017 01:08 IST

राजू शेट्टी : कारखाना तत्काळ सुरू करण्यासाठी दीर्घकालीन धोेरण हवे

नाशिक : काही चुकीच्या धोरणांमुळे आज आर्थिक गर्तेत सापडलेला निफाड सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांनीच चालविला पाहिजे, तो कोणत्याही खासगी व्यक्तीच्या  घशात जाऊ दिला जाणार नाही. निसाका विकण्यास स्वाभिमान शेतकरी पक्षाचा विरोध असेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. गोदाकाठ परिसरातील एका कृषी विषयक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी निफाड तालुक्यातील शेतकरी व निसाका सुरू होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निसाका बचाव कृती समितीने हा कारखाना तत्काळ सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार राजू शेट्टी यांना दिले. शेट्टी म्हणाले की, ५३ गावांचे कार्यक्षेत्र असलेला निसाका बंद राहणे चुकीचे आहे. सुरुवातीला हा कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यास द्यावा. ३०० कोटींचे कर्ज फार मोठे कर्ज नाही. त्यासाठी सरकारने दीर्घकालीन धोरण ठरवून कारखाना तत्काळ सुरू करणे गरजेचे आहे. निफाड साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचीच मालकी असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी योगेश पाटील, स्वाभिमान पक्षाचे हंसराज वडघुले, नितीन रोटे-पाटील, शरद लभडे, जगन कुटे, सुनील कुटे, खेलूकर यांच्यासह गोदाकाठ परिसरातील असंख्य नागरिक व शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)