निसाका, रासाकासाठी गोदाकाठवासीयांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:10 IST2020-07-15T21:50:08+5:302020-07-16T00:10:15+5:30
निफाड : बंद पडलेले निसाका आणि रानवड साखर कारखाना शासनदरबारी प्रयत्न करून कार्यान्वित करावे, या मागणीचे निवेदन देऊन गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले.

निसाका, रासाकासाठी गोदाकाठवासीयांचे साकडे
निफाड : बंद पडलेले निसाका आणि रानवड साखर कारखाना शासनदरबारी प्रयत्न करून कार्यान्वित करावे, या मागणीचे निवेदन देऊन गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले.
निफाडमध्ये आढावा बैठकीसाठी आलेल्या भुसे यांनी निफाड सोसायटीला भेट दिली. याप्रसंगी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके, माजी आमदार अनिल कदम व जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी निसाकासाठी शासनदरबारी
आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले. निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुक्यात साडेपाच हजार हेक्टरपेक्षा अधिक ऊस उभा आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यात रसवंतीगृहे बंद असल्याने उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात निफाडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याही आत्महत्या होऊ शकतात. त्यामुळे निसाका - रासाका कार्यान्वित होणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी शासन दरबारी आपण सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सुधीर कराड, अनिल कुंदे, संजय कुंदे, विक्र म रंधवे, ललित गीते, कोठूरेचे सरपंच आशिष मोगल, तानाजी पूरकर, संपत डुंबरे, भुसेचे दत्तू भुसारे, रामदास गिते, उपस्थित होते.