जिल्हा मैदानी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी निफाडची आघाडी

By Admin | Updated: November 12, 2014 01:08 IST2014-11-12T01:08:12+5:302014-11-12T01:08:42+5:30

जिल्हा मैदानी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी निफाडची आघाडी

Niphad's lead on the second day of the district tournament | जिल्हा मैदानी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी निफाडची आघाडी

जिल्हा मैदानी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी निफाडची आघाडी

 नाशिक : ग्रामीण विभागाच्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी नाशिक तसेच सुरगाण्याच्या खेळाडूंना मागे टाकत निफाड तालुका खेळाडूंनी आघाडी घेत वर्चस्व राखले़ मुले तसेच मुलींच्या गटाच्या १६ प्रकारच्या मैदानी स्पर्धा आज झाल्या़ छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे या स्पर्धा सुरू असून, महापालिका गटाच्या स्पर्धांनंतर आता ग्रामीण गटाच्या स्पर्धांना सुरुवात झाली आहे़ आज दुसऱ्या दिवशी मुलांच्या गटात निफाडच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले, तर मुलींच्या गटात नाशिक तसेच निफाडसह सिन्नरचे खेळाडू चमकले़

Web Title: Niphad's lead on the second day of the district tournament