जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे निफाडकरांना डोहाळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:39 AM2019-11-22T00:39:46+5:302019-11-22T00:42:07+5:30

ओझर : नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बरांना डोहाळे लागले असताना जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या निफाड तालुक्याच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.

Niphadkar looks at Zilla Parishad president! | जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे निफाडकरांना डोहाळे !

मंदाकिनी बनकर

Next
ठळक मुद्देकडाक्याच्या थंडीत खमंग चर्चा : बनकर-कदम यांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला

सुदर्शन सारडा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बरांना डोहाळे लागले असताना जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या निफाड तालुक्याच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.
मागील तीन वर्षांपूर्वी निफाड तालुक्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळावे म्हणून जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. आज त्याच पदासाठी पुन्हा एकदा नवीन आशेची पालवी फुटून तालुक्यात अध्यक्षपद मिळेल अशी चर्चा सुरू आहे. तालुक्यातून आमदार दिलीप बनकर यांच्या सौभाग्यवती पालखेड गटाच्या जिल्हा परिषद सदस्य मंदाकिनी बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांचे निकटवर्तीय उगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे गटनेते बाळासाहेब क्षीरसागर यांच्या दोघांच्या नावाची चर्चा सुरू असून, दोन्हीही नेते पक्षश्रेष्ठींकडे आपली ताकद अजमावित असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य आहे. त्यामुळे हे पद शिवसेनेकडे कायम राहील अशी शक्यता वर्तविली जात असल्याने विद्यमान अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या निवडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अनिल कदम तालुक्यासाठी अध्यक्षपद खेचून आणतात की राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विधानसभा निवडणुकीत विश्वास सार्थ ठरविणारे आमदार दिलीप बनकर हे पद मंदाकिनी बनकर यांच्यासाठी खेचून आणतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मंदाकिनी बनकर मागील वेळी इच्छुक होत्या, तसा प्रयत्नदेखील झाला होता, मात्र सदस्यांची गोळाबेरीज जमली नसल्याने शिवसेनेकडे हे पद गेले. विधानसभा निवडणूक काळात अनिल कदम हे मंत्रिपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात होते, मात्र त्यांचा पराभव झाल्याने मंत्रिपदाला हुलकावणी मिळाली.
त्यामुळे ते या पराभवाची भरपाई म्हणून तालुक्यात बाळासाहेब क्षीरसागर यांच्या रूपाने मिनी मंत्रालयाचे पद खेचून आणतात की महाशिवआघाडीची सत्ता स्थापन होऊन मंत्रिपदाचे दावेदार असणारे दिलीप बनकर हे सरकार स्थापन होण्याअगोदर स्वत:ऐवजी पत्नीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवितात याबाबत तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.निफाडला चार वेळा माननिफाड तालुक्याने आजपर्यंत चार वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. माजी आमदार दुलाजीनाना पाटील, मालोजीराव मोगल यांनी प्रत्येकी एक वेळा तर पंढरीनाथ थोरे यांनी सलग दोनवेळा अध्यक्षपद भूषविले आहे, मात्र २००४ नंतर या पदाने तालुक्याला सातत्याने हुलकावणी दिली आहे.
आगामी काही महिन्यात हेविवेट समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव बाजार समितीची निवडणूक होत असून, त्याच पार्श्वभूमीवर रणनीती नजरेत ठेवून कदम आणि बनकर यांनी आपली प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. राजकीय सजगता असलेल्या निफाडमध्ये लालदिव्यासाठी पुन्हा फड रंगेल, अशी खमंग चर्चा कडाक्याच्या थंडीत जोर धरत आहे.

Web Title: Niphadkar looks at Zilla Parishad president!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.