शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

निफाडला राष्टÑवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 5:02 PM

निफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शुक्रवारी निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

ठळक मुद्दे विविध मागण्या : जायकवाडीला पाणी देण्यास विरोध

निफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शुक्रवारी निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.निफाड मार्केट यार्ड येथून दुपारी दीडच्या दरम्यान मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी माजी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार होते. हा मोर्चा निफाड बसस्थानकमार्गे निफाड तहसील येथे आल्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.या सभेत बोलताना दिलीप बनकर म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला असून, अशा गंभीर परिस्थितीत नाशिकच्या धरणाचे पाणी जर जायकवाडीसाठी सोडण्याचा प्रयत्न झाला तर निफाड तालुक्यातील सर्वांना मतभेद विसरून हे पाणी मराठवाड्याला जाऊ न देण्यासाठी लढा उभारावा लागेल. नाशिकच्या पाण्याचा एक थेंबही आम्ही मराठवाड्यात जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले. निफाड तालुक्यात विजेचे प्रश्न गंभीर झाले आहेत. शेतमालाला भाव नाही, शेतकरी अडचणीत आहे. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की भाजपा-सेनेवाले भावनिक प्रश्न उकरून तरु णांची माथी भडकविण्याचे काम सुरू करतात, हेच काम त्यांनी पुन्हा सुरू केले आहे. १०० दिवसात महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते, उलट महागाई दुप्पट झाली. जिल्ह्यात भयानक दुष्काळ आहे. ६० टँकर चालू आहे. नाशिकचे पाणी मराठवाड्याला सोडून या सरकारला तिकडचे बियरचे कारखाने चालू ठेवायचे आहे, असा आरोप पगार यांनी केला. याप्रसंगी विलास बोरस्ते, सुभाष जाधव, अशपाक शेख यांची भाषणे झाली. याप्रसंगी मोर्चेकºयांनी प्रांत महेश पाटील यांना निवेदन दिले. याप्रसंगी जि.प. सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, सुरेश खोडे, निफाडचे नगरसेवक देवदत्त कापसे, दिलीप कापसे, सागर कुंदे, दत्ता रायते, गोकुळ गिते, राजेंद्र बोरगुडे, राजेंद्र सांगळे, विजय कारे, माधव ढोमसे, संजय मोरे, महेश चोरडिया, भूषण धनवटे, सचिन मोगल, निवृत्ती धनवटे, अश्विनी मोगल, संजय वाळुंज, नंदकुमार कदम, ज्ञानेश्वर खाडे, दगू नागरे, शरद काळे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.-------------------------अशा आहेत मागण्या...निफाड तालुक्यातील शेतकºयांच्या कृषी पंपांचे लोडशेडिंग कमी करणे, जळालेले रोहित्र त्वरित मिळावे, निफाड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, नाशिक जिल्ह्याला पुढील काळात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे यासाठी उपलब्ध पाण्याचे व्यवस्थित नियोजन व्हावे, भविष्यात होणाºया पाणीटंचाईबाबत त्वरित आवश्यक ती पाऊले उचलावीत, तालुक्यातील प्रमुख रस्ते, गाव रस्ते व शेतमाल वाहतूक रस्त्यांची तातडीने दुरु स्ती व्हावे, स्वाइन फ्लूसारख्या संसर्गजन्य रोगावर त्विरत योग्य त्या उपाय योजना राबवाव्या, पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत या व इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या.