निफाडला भोंदूबाबासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:52 AM2019-01-15T00:52:17+5:302019-01-15T00:54:24+5:30

निफाड : नाशिकच्या महिलेला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत सदर महिलेने शारीरिक संबंध करावे यासाठी अघोरी पूजेसाठी उपाय सांगणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या दोघा साथीदारांना निफाड पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अटक केली असून, त्यांना निफाड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.

Niphadake Bhondu Baba and three arrested | निफाडला भोंदूबाबासह तिघांना अटक

निफाडला भोंदूबाबासह तिघांना अटक

Next
ठळक मुद्देपैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष : पीडित महिलेची तक्रार

निफाड : नाशिकच्या महिलेला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत सदर महिलेने शारीरिक संबंध करावे यासाठी अघोरी पूजेसाठी उपाय सांगणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या दोघा साथीदारांना निफाड पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अटक केली असून, त्यांना निफाड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, प्रसाद उत्तमराव जाधव याच्याशी ओळख झालेल्या या महिलेला दि. १० जानेवारी रोजी निफाड येथे एक बाबा असून, तो पैशांचा पाऊस पाडतो, त्याला पूजेसाठी एका मुलीची गरज आहे, तुम्ही काम कराल काय, अशी विचारणा केली व त्यांचा फोटो काढून बाबाला मोबाइलवर पाठविला आणि प्रत्यक्ष भेट घेण्याचे ठरले. सदर महिलेने हिंमत केली आणि घटनेला सामोरी गेली. प्रसाद जाधव याने महिलेची आणि संशयित भोंदूबाबा योगेश वाळीबा नागरे (रा. शिवरे, ता. निफाड) याची निफाड येथे १२ जानेवारी रोजी शिवपार्वती लॉन्स येथे भेट घडवून आणली. या भेटीत बाबाने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी महिलेला शुद्धीकरण विधी व पूजा करावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी १३ जानेवारीला निफाडला बोलावले. ही बाब महिलेने आपल्या साथीदारांना सांगितली आणि या सर्वांनी या घटनेचा पर्दाफाश करण्याचे ठरविले. त्यानंतर पीडित महिला, प्रसाद जाधव आणि योगेश सोनार यांच्यासह नाशिक येथून निफाड येथे आले. बाबाच्या अल्टो गाडीमध्ये पीडित महिला व सदर बाबा बसले असता भोंदूबाबा नागरेने महिलेला शुद्धीकरणासाठी आपल्याबरोबर शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे सांगितले. त्याचबरोबर महिलेला उत्तेजक द्रव्याच्या २ गोळ्या व एक पावडरची पुडी दिली. दरम्यान बाबा आपल्यासोबत काहीतरी वाईट करणार हे लक्षात आल्याने महिलेने तुषार गवळी यांना एसएमएस केला. सदर सहकाºयांनी निफाड पोलीस स्टेशनला ताबडतोब फोनद्वारे कळवले. निफाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भोंदूबाबासह तिघांना ताब्यात घेतले. योगेश वाळीबा नागरे (शिवरे, ता. निफाड ) योगेश आत्माराम सोनार (पवननगर, सिडका,े नाशिक) प्रसाद उत्तमराव जाधव (टाकळी विंचूर, ता. निफाड ) या तिन्ही संशियतांवर महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व जादुटोणा प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाडचे पोलिस उपअधीक्षक माधव पिडले, पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सातव तपास करत आहेत.छत्रपती सेनेची महत्त्वपूर्ण भूमिकाफिर्यादी महिलेने या प्रकरणी संशय आल्यानंतर सतर्कता दाखवत भंडाफोड करण्यासाठी प्रयत्न केला. सदर महिलेने पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रकार आणि पूजेसाठी बाबाने शरीरसुखाची मागणी घातल्याची बाब आपल्या साथीदारांना सांगितली आणि या प्रकाराचा पर्दाफाश करण्याची योजना आखली. यामध्ये नाशिकचे अंधश्रद्धा विरोधात काम करणारे आणि छत्रपती सेनेचे अध्यक्ष तुषार गवळी, तानाजी शेलार, नीलेश शेलार, धीरज खोळंबे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. पीडित महिलेने निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

Web Title: Niphadake Bhondu Baba and three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.