निफाडला विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:54 IST2020-07-29T20:08:08+5:302020-07-30T01:54:16+5:30

निफाड : नाशिक - औरंगाबाद या महामार्गावर निफाड पासुन दोन किलोमीटर अंतरावरील आचोळा नाला परिसरात रहाणाऱ्या दोघांचा श्ेतीचा पंप चालू करताना विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Niphad died of electric shock | निफाडला विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

निफाडला विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

ठळक मुद्दे पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

निफाड : नाशिक - औरंगाबाद या महामार्गावर निफाड पासुन दोन किलोमीटर अंतरावरील आचोळा नाला परिसरात रहाणाऱ्या दोघांचा श्ेतीचा पंप चालू करताना विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत निफाड पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. २८) सांयकाळी निफाड शिवारातील आचोळा नाला या भागात शेतात विद्युत पंप चालु करण्यासाठी गेलेल्या शिवाजी अशोक भगरे (३०) व किरण भिमा माळी (२६) या दोघांना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. निफाड उपजिल्हा रु ग्णालयात या दोघांच्या उत्तरीय तपासणी करण्यात आली.
दोघांचे मृतदेह शवविच्छेदानानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नितीन मंडलीक, पोलीस कॉन्स्टेबल राजू मनोहर, पोलीस कॉन्स्टेबल दिपक पगार हे तपास करीत आहेत.

Web Title: Niphad died of electric shock