शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या प्रतिसादावरच पुढील निर्णय अवलंबून मुख्यमंत्री ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:47 IST

करोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दीवर नियंत्रण आणणारे आहेत.  या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित असून नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहूनच  पुढील निर्णय घेतला जावा अशा सूचना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गतवेळेपेक्षा काेरोचे व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

ठळक मुद्देओझर विमानतळावर घेतला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

नाशिक : करोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दीवर नियंत्रण आणणारे आहेत.  या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित असून नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहूनच  पुढील निर्णय घेतला जावा अशा सूचना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गतवेळेपेक्षा काेरोचे व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नंदुरबार दौऱ्यावर असतांना मुख्यमंत्री   ओझर विमानतळावर उतरले असता तेथे त्यांनी नाशिक जिल्ह्याचा काेरोना आढावा घेतला.  या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे उपस्थित होते.मुख्यमंत्री  म्हणाले की, नागरिकांमध्ये लसीकरणाची जागृती वाढत आहे.  त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिले.  गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष देण्याची गरज असून  विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना   ठाकरे यांनी पोलीस विभागाला केली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.आरोग्य सुविधा पुरेशा : जिल्हाधिकारीजिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटीलेशन बेड , रेमडिसिव्हर व अन्य औषधे यासह आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शासनाने घालून दिलेल्या टेस्ट-ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी सर्व यंत्रणा  करतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.   

टॅग्स :NashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी