शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नूतन कार्यकारिणीला बुधवारचा मुहूर्त

By admin | Updated: April 9, 2017 00:12 IST

नाशिक : सावानाचे काळजीवाहू अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी बुधवारी (दि. १२) नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

 नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीचे अधिकृत निकाल शुक्रवारी (दि. ७) निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी नाट्यमयरीत्या जाहीर केल्यानंतर सावानाचे काळजीवाहू अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी बुधवारी (दि. १२) नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती दिली.बुधवारी (दि.१२) सार्वजनिक वाचनालयाच्या मिटिंग हॉलमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या बैठकीत कार्याध्यक्ष, प्रमुख सचिव, सहायक सचिव, ग्रंथसचिव, अर्थसचिव, सांस्कृतिक कार्यसचिव, नाट्यगृह सचिव आणि वस्तुसंग्रहालय सचिव आदि नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. यावेळी बँकेतील तसेच आर्थिक व्यवहार करण्यासाठी सह्यांचेदेखील अधिकार बदलण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. ग्रंथमित्र पॅनलला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर आता कार्याध्यक्ष, कार्यवाह आणि अर्थसचिवपदी पॅनलमधील कोणत्या विजयी उमेदवारांची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, मंगळवारी (दि. ११) संध्याकाळी साडेसहा वाजता वाचनालयाच्या मिटिंग हॉलमध्ये वाचनालयाच्या मावळत्या कार्यकारिणीला निरोप आणि नूतन कार्यकारिणीच्या स्वागत सोहळ्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती विलास औरंगाबादकर यांनी दिली. शुक्रवारी (दि. ७) निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी फेरमतमोजणीची प्रक्रिया एका महिन्यापर्यंत स्थगित केल्यानंतर संध्याकाळी घाईघाईत अंतिम आणि एकत्रित निकालपत्र काळजीवाहू अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्याकडे सुपूर्द करताना अठराव्या क्रमांकाचे विजयी उमेदवार धनंजय बेळे यांचे नाव समाविष्ट केले असले तरी हे नाव समाविष्ट करताना बेळे यांचा यादीतील समावेश फेरमतमोजणीच्या अंतिम निकालाला अधीन राहून केला असल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याने फेरमतमोजणीच्या निकालाचे औत्सुक्य कायम आहे. (प्रतिनिधी)