नवीन जिल्हाधिकारी आज मुख्यालयात

By Admin | Updated: February 10, 2015 01:41 IST2015-02-10T01:40:03+5:302015-02-10T01:41:27+5:30

नवीन जिल्हाधिकारी आज मुख्यालयात

New District Collectors today at the headquarters | नवीन जिल्हाधिकारी आज मुख्यालयात

नवीन जिल्हाधिकारी आज मुख्यालयात

  नाशिक : नाशिकच्या जिल्हाधिकारी बदली झालेले सांगली जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशावह हे उद्या (दि.१०) नाशिकला पदभार स्वीकारण्याबरोबरच सिंहस्थाच्या तयारीची आढावा बैठक घेणार आहेत. सोमवारी (दि.९) त्यांनी मुंबई येथे झालेल्या सिंहस्थाच्या बैठकीला हजेरी लावली. तसेच सिंहस्थाच्या कामांचा आढावाही सादर केला. मंगळवारी (दि.१०) सकाळी ते त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ तयारीची बैठक घेणार असून, लगेचच दुपारी नाशिकला मुख्यालयी येऊन खातेप्रमुखांची अनौपचारिक चर्चा करून दुपारी तीन वाजता सिंहस्थ कामांच्या तयारी संदर्भात नियमित बैठक घेणार आहेत. मंगळवारीच ते अधिकृतपदी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारतील. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नव्यानेच आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवर अनेक मोठ्या जबाबदारी येऊन पडणार असून, सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: New District Collectors today at the headquarters