शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पंधरा वर्षात कधी नव्हे इतका ‘तो’ यंदा जुलैमध्ये शहरात बरसला....

By अझहर शेख | Published: August 08, 2019 2:56 PM

पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचे प्रमाण जिल्ह्यांमधील डोंगररांगाच्या तालुक्यांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देयावर्षी जुलैअखेर ४९७ मिमीपर्यंत पाऊसपावसाने मागील सर्व विक्रम मागे टाकलेदोन दिवसांपासून विश्रांतीया हंगामात ९८४ मिमीपर्यंत पाऊस

अझहर शेख, नाशिक : यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले तसेच सुरूवातीला मान्सून कमकुवत असल्यामुळे नागरिकांमध्ये पर्जन्यमानाविषयी चिंतेचे ढग दाटू लागले होते; मात्र अचानकपणे लहरी निसर्गाने आपले रूप बदलले आणि वरूणराजाची कृपादृष्टी झाली. त्यामुळे पावसाने मागील सर्व विक्रम मागे टाकले. मागील पंधरा वर्षांमध्ये जुलैअखेर कधी नव्हे इतका पाऊस यावर्षी शहरात पडल्याची नोंद हवामान केंद्राने केली आहे. चालू आठवड्यात अद्याप १९० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यावर्षी जुलैअखेर ४९७ तर या हंगामात गुरूवारी (दि.८) ९८४ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे.

शहरासह जिल्ह्यात पावासाची स्थिती जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बिकट बनली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच हवालदिल झाले होते. पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने सलग दहा ते बारा दिवस उघडीप दिली. अचानकपणे पावसाची स्थिती बिघडल्यामुळे शहरासह जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. शहरवासियांना ऐन जुलैमध्ये पाणीकपातीचाही सामना करावा लागला; मात्र जुलैचा दुसरा आठवडा संपत नाही तोच पावसाने मजबुत ‘कम बॅक’ केले. दहा दिवसांच्या उघडीपीची कसर पावसाने भरून काढली. त्यामुळे जुलैअखेर शहरात तब्बल ४९७ मि.मीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. मागील २००६सालापासून अद्याप इतका पाऊस जुलैमध्ये शहरात कधीही पडल्याची नोंद हवामान केंद्राकडे नाही. त्यामुळे यापुर्वीचे सगळे विक्रम पावसाने मोडीत काढले असून शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुके सुजलाम, सुफलाम होत आहे.

शहरासह जिल्ह्यात पावसाची समाधानकारक हजेरी सुरू झाल्याने जिल्ह्यांमधील गंगापूर, दारणा, भावली, गौतमी, काश्यपी, मुकणे, कडवा, आळंदी, वाघाड, पालखेड, करंजवण अशी विविध धरणे भरली आहेत. या सर्व धरणांमधून नदीपात्रात विसर्गदेखील केला जात आहे. एकूणच शहरासह जिल्ह्याची स्थितीदेखील सुजलाम-सुफलाम होऊ लागल्यामुळे नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.दोन दिवसांपासून विश्रांतीपावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली असली तरी पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे पुन्हा पावसाचे प्रमाण जिल्ह्यांमधील डोंगररांगाच्या तालुक्यांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्ष - पाऊस (जुलैअखेर मिमी.)
२००४- ११३२००५ - २३१२००६- ३५०२००७ - २८४.९२००८ - २०१.८२००९ - २६१.५२०१७ - १७०.०२०११ - १४४.५२०१२ - १७१.१२०१३ - २३२.७२०१४- ३३१.९२०१५- ११६.७२०१६- ४८१.९२०१७- ४८०.३२०१८- २८४.१--

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसgangapur damगंगापूर धरणgodavariगोदावरी