Ashok Kharat Case : अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणारा नीरज जाधव सापडला?; पोलिस कालपासून शोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:27 IST2026-03-20T17:12:22+5:302026-03-20T17:27:26+5:30

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणारा नीरज जाधव याच्या मागावर पोलिस आहेत.

Neeraj Jadhav, who leaked Ashok Kharat's objectionable video, found; Police arrest him, accused of blackmailing women | Ashok Kharat Case : अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणारा नीरज जाधव सापडला?; पोलिस कालपासून शोधात

Ashok Kharat Case : अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणारा नीरज जाधव सापडला?; पोलिस कालपासून शोधात

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या केबीनमध्येच त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.  खरात याचे आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणारा ऑफिसबॉय नीरज जाधव याच्या मागावर नाशिक पोलिस आहेत.  अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व्हिडीओ बाहेर काढून खंडणी उकळण्याचा आणि महिलांना ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे.

Shambhuraj Desai: सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, नीरज जाधव हा अशोक खरात याच्याकडे ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. याच काळात त्याने खरात यांचे महिलांसोबतचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ आपल्याकडे घेतले. यानंतर त्याने सर्वात आधी अशोक खरात याला हे व्हिडीओ दाखवून मोठ्या रकमेची खंडणी मागितली. मात्र, खरात याने ही खंडणी देण्यास स्पष्ट नकार दिला.

महिलांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात

खरात याच्याकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून नीरजने आपला मोर्चा व्हिडीओतील पीडित महिलांकडे वळवला. त्याने या महिलांना त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून त्यांना त्रास देण्यास आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून तो महिलांना धमकावत होता. खरात याचे व्हिडीओ नीरजनेच बाहेर काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिस अजूनही मागावर

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे आज नीरज जाधव याच्या मागावर अजूनही पोलिस आहेत. जाधव हा पुण्याच्या दिशेने फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.  त्याच्याकडे असलेल्या मोबाईल आणि इतर उपकरणांमधून आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

Web Title : अशोक खरात को ब्लैकमेल करने वाला नीरज जाधव गिरफ्तार, उगाही, ब्लैकमेलिंग।

Web Summary : अशोक खरात के वीडियो लीक करने वाला नीरज जाधव गिरफ्तार। उसने खरात को ब्लैकमेल किया और महिलाओं को वीडियो ऑनलाइन जारी करने की धमकी दी।

Web Title : Ashok Kharat's blackmailer, Neeraj Jadhav, arrested for extortion, blackmail.

Web Summary : Neeraj Jadhav, who leaked Ashok Kharat's videos, was arrested. He extorted Kharat and blackmailed women, threatening to release the videos online.