शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून सदस्यांना चुचकारण्याचे प्रयत्न

By admin | Updated: March 29, 2017 01:01 IST

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपासोबत जाऊन फरफट झाल्याचा दावा करीत आता तरी शिवसेनेसोबत चला, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीच्या एका गटाने दिल्याचे वृत्त आहे.

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपासोबत जाऊन फरफट झाल्याचा दावा करीत आता तरी शिवसेनेसोबत चला, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीच्या एका गटाने दिल्याचे वृत्त आहे.  दरम्यान, पंडित कॉलनीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या या बैठकीकडे पक्षातील अनुभवी सदस्यांनी पाठ फिरविल्याची चर्चा असल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याचा दावा भाजपाने केल्याचे समजते. अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सोेमवारी (दि.२७) पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच पाच एप्रिलच्या विषय समिती सभापती पदाच्या घडामोडींसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून हालचालींना सुरुवात झाली आहे. पंडित कॉलनीत एका बॅँकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गटनेत्यांच्या उपस्थितीत काही सदस्यांची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीस राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडून आलेल्या निम्म्याहून अधिक सदस्य उपस्थित असल्याचे कळते. या बैठकीत आगामी विषय समिती सभापती निवडणुकांमध्ये नेमकी काय भूमिका घ्यावी, भाजपासोबत राहून विरोधी पक्षात राहायचे की, पहिली चूक सुधारून शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होऊन पदरात पडतील तितक्या विषय समिती सभापतिपद मिळवावे, असा चर्चेचा नूर असल्याचे समजते. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनीच चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे गटनेते उदय जाधव यांना सदस्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसारच ही बैठक झाल्याची चर्चा आहे. आता लवकरच वरिष्ठ पातळीवर या बैठकीची माहिती देण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)