शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
5
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
6
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
7
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
8
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
9
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
10
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
11
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
12
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
13
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
14
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
15
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
16
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
17
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
18
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
19
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
20
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

पिंपळगाव लेप येथील श्री रेणुका देवीचा नवरात्रोत्सव भाविकाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:03 IST

पिंपळगाव लेप : येथील श्री रेणूका देवी जागृत व नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांसाठी देवस्थान बंद असले तरी नित्यपूजा पाठ व धार्मिक कार्यक्रम मात्र भाविकांविना सुरू आहे.

ठळक मुद्दे श्री रेणूका देवीला सुमारे तीनशे वर्षांपूर्वींचा इतिहास

पिंपळगाव लेप : येथील श्री रेणूका देवी जागृत व नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांसाठी देवस्थान बंद असले तरी नित्यपूजा पाठ व धार्मिक कार्यक्रम मात्र भाविकांविना सुरू आहे.नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे घटस्थापना केली जाते. मंदिर व परिसर विद्युत रोषणाईने नटविला जातो, तर येथेही महिला नऊ दिवस घटी बसण्याची परंपरा आहे. दिवाळी नंतर पंंधरा दिवसांनी त्रिपुरारी पौर्णिमेस येथे देवीची मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येथे गर्दी करत असतात.पिंपळगाव लेप येथील श्री रेणूका देवीला सुमारे तीनशे वर्षांपूर्वींचा इतिहास सांगितला जातो. पुरातन काळात गोपीनाथ सबनीस यांची माहुरगडच्या श्री रेणुका देवीवर एकनिष्ठ अपार श्रद्धा होती. ते नित्यनेमाने माहुरगडवर श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी पायी वारी करत. वृध्दापकाळाने त्यांना माहुरगडावर जाणे शक्य होणार नसल्याने त्यांनी शेवटची वारी म्हणून मजल-दर मजल करत माहुरगड गाठले. येथून पुढे येऊ शकत नसल्याने दु:खी होऊन साश्रूनयनांनी श्री रेणुकेचे दर्शन घेऊन बाहेर पडतांना मंदिरा बाहेर पडतांना ते अडखळत होते. सबनीस यांच्या भक्तीने प्रसन्न होवून देवीने मी तुझ्या गावी तुझ्या मागेमागे येईन, परंतु गाव येई पर्यंत तु मागे वळून बघायचे नाही. तु जर मागे वळून बघितलं तर मी येथेच गुप्त होईल. असा दृष्टांत दिला. सबनीस माहुरगडाहून पिंपळगाव लेप गावाकडे पायी निघाले परंतु देवी खरोखरच पाठीमागे येती आहे का, अशी शंका आली आणि त्यांनी गावाजवळ आल्यावर मागे वळून पाहिले. देवी खरंच आली होती, मात्र सबनीस मागे वळाल्याने देवी तिथेचं अंर्तधान पावली व शिळा झाली. त्याच ठिकाणी पुरातन काळात मंदिर उभारणी करण्यात आली. अशी अख्यायिका सांगीतली जाते.सबनीस परिवाराकडून देवी भक्तीचा वारसा कायम आहे. सध्या पद्माकर सबनीस हे देवी पुजापाठाचे काम करतात. परिसरातील भाविक या ठिकाणी येवून देवीला नवस बोलतात. तर नवसपूर्ती करणारे जागृत देवस्थान म्हणूनही येथील देवीची ख्याती आहे. दरवर्षी शेंदुराचा लेप देवीच्या मुखवट्याला चढविला जात असल्याने थरावर थर होवून देवी मुर्तीचे स्वरूप बदलले होते. मात्र ग्रामस्थांच्या सहकार्याने विधीवत सदर लेप हटविण्यात आल्याने देवीची मुर्ती आकर्षक दिसू लागली. तेव्हापासून गावाची पिंपळगाव लेप अशी सरकारी दप्तरी नोंद झाल्याचे सांगीतले जाते.(फोटो २० रेणुकादेवी)येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील मंदिरातील श्री रेणुका देवी तसेच भगवान परशुराम मूर्ती.

टॅग्स :yevla-acयेवलाNavratriनवरात्री