शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवात वाहतूक मार्गात बदल

By admin | Updated: September 30, 2016 02:43 IST

कालिका यात्रा : सकाळ - संध्याकाळ राहणार जुना आग्रारोड बंद

 नाशिक : सालाबादप्रमाणे येत्या शनिवार (दि.१) पासून शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखली जाणारी कालिका देवीची यात्रा सुरू होत आहे. यानिमित्त मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली असून, गडकरी चौक व चांडक सर्कल येथून पुढे सकाळी व संध्याकाळी मार्गस्थ होता येणार नसल्याची अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण विभागाने जाहीर केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येत्या एक तारखेपासून मोडक चौक सिग्नलपासून महामार्गापर्यंत व महामार्गापासून मोडक सिग्नलपर्यंतचा रस्ता, चांडक सर्कल ते महामार्ग हे रस्ते पहाटे पाच ते दुपारी बारा व संध्याकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.एसटी बसेससह सर्व प्रकारची हलकी व जड वाहने मोडक सिग्नलवरून खडकाळी सिग्नलमार्गे साठफुटी रोडने द्वारकेवरून सिडको व नाशिकरोडकडे जातील. तसेच मुंबई नाक्यावरून येणारी हलकी वाहने महामार्ग बसस्थानकमार्गे चांडक सर्कलकडे जातील. शहरातून अंबड, सातपूर परिसरात जाणारी सर्व जड वाहने ही द्वारकेवरून गरवारे सर्कलमार्गे सातपूर औद्योगिक वसाहतीतून पुढे जातील. द्वारकेवरून पंचवटीत जाणारी जड वाहने ही कन्नमवार पुलावरून रासबिहारी शाळेच्या मार्गाने पंचवटीमध्ये जातील. सारडा सर्कलवरून गडकरी चौकाकडे येणारी वाहने एन. डी. पटेल रोडवरून मोडक सिग्नलमार्गे पुढे जातील. वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशामक बंबांसाठी लागू नसणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. भाविकांनी या वाहनांसाठी रस्ता खुला करून द्यावा, असे आवाहन पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)