Navdurga sports award distribution ceremony | नवदुर्गा क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा

नवदुर्गा क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा

ठळक मुद्देमहिला दिन : सामाजिक क्षेत्रातील समाजसेविकांचाही गौरव

नाशिक : कालिका मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने महिला दिनानिमित्ताने क्रीडाक्षेत्रातील गुणवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कालिका मंदिर हॉल येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार देवयानी फरांदे उपस्थित होत्या. यावेळी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर, टाउन प्लॅनिंगच्या विभागीय उपआयुक्त प्रतिभा भदाणे, स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी, उद्योजिका तेजस बस्ते-धोपवकर, समाजसेविका सीमंतिनी कोकाटे, नगरसेविका समिना मेमन, प्राचार्य डॉ.ज्योत्स्ना सोनखासकर, ज्युली डिसूझा, माधुरी अभ्यंकर-लुकमानी यांचा सत्कार करण्यात आला.
या नवदुर्गाबरोबरच नाशिकच्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मोनिका आथरे, अस्मिता दुधारे, वैशाली तांबे, रोशनी मुर्तडक, निकिता काळे, कामिनी केवट, मनीषा काठे, राष्ट्रीय खेळाडू सुरेखा पाटील, जागृती ठाकूर, मंगला शिंदे, मीनाक्षी गवळी, मीनाक्षी गिरी याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. वर्षा पाटील, व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या मनीषा पगारे, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया माया खोडवे अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाºया महिलांचा समावेश होता.
याप्रसंगी जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, क्र ीडा संघटक अशोक दुधारे आदी उपस्थितीत होते.
आम्ही साºया जणी संघटनेतर्फे सत्कार
आम्ही साºया जणी या महिला संघटनेतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे येथील श्री संत सेवा संघाच्या सदस्या ज्ञानेश्वरी गोडबोले उपस्थित होते. यावेळी गोडबोले म्हणाल्या की, अहंकार, स्वार्थ आणि कोणत्याही वस्तूंचा अतिरेक यामुळे माणूस माणसापासून दूर चालला आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे पुढे गेले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. महिला दिनानिमित्त प्रतिकूल परिस्थितीत यश मिळविलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यात अभिनेत्री सृष्टी पगारे, मॅरेथॉन जिंकणारी धावपटू पूनम सोनुने, कराटेपटू स्नेहा पाटील, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. आरती चिरमाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व सत्कारार्थींची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार पद्मा सोनी, इंद्रा लघाटे यांनी घेतली. यावेळी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक संजीवनी कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन रेवती पारेख यांनी केले.

Web Title:  Navdurga sports award distribution ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.