शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चित्रपट संगीताला दिशा देणारे ‘नौशाद’: शशिकांत किणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:20 IST

तब्बल साठ वर्षे सिनेमासृष्टीची सेवा करत भारतीय चित्रपटांच्या संगीताला ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांनी दिशा दिली. त्यांच्या अजरामर संगीतामुळे अनेक चित्रपट गाजले, असे प्रतिपादन नौशाद अली यांचे मराठीत आत्मचरित्र लिहिणारे शशिकांत किणीकर यांनी केले.

सावाना ग्रंथालय सप्ताहनाशिक : तब्बल साठ वर्षे सिनेमासृष्टीची सेवा करत भारतीय चित्रपटांच्या संगीताला ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांनी दिशा दिली. त्यांच्या अजरामर संगीतामुळे अनेक चित्रपट गाजले, असे प्रतिपादन नौशाद अली यांचे मराठीत आत्मचरित्र लिहिणारे शशिकांत किणीकर यांनी केले.  सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने औरंगाबादकर सभागृहात सुरू असलेल्या ग्रंथालय सप्ताहात सोमवारी (दि.१७) किणीकर यांनी ‘दास्तान-ए-नौशाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीतकार नौशाद अली यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सुरुवातील नौशाद अली यांच्या खडतर व संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. त्यानंतर त्यांच्या चित्रपटसृष्टीमधील योगदानाचा आढावा घेण्यास सुरुवात केली.सर्वप्रथम नौशाद यांना आपल्या संगीताची जादू दाखविण्याची संधी मिळाली ती १९४० च्या ‘प्रेमनगर’ चित्रपटातून. ‘स्टेशन मास्टर’ या चित्रपटानंतर संगीत दिग्दर्शक म्हणून नौशाद नावारूपाला आले. ‘नई दुनिया’नंतर त्यांनी १९४२ साली सरदार मलिक यांनी नौशाद यांना सोबत घेत त्यांची संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्या संस्थेत नियुक्ती केली. नौशादजींच्या संगीतामुळे दिग्दर्शक बी. आर. चोपडा यांचा ‘कानून’ चित्रपट प्रेक्षकांनी त्यावेळी डोक्यावर घेतला.यावेळी पलट तेरा ध्यान किधर हैं..., जब दिल ही तुट गया..., क्या मील गया भगावान मेरे दिल को दुखा के... यांसारखी नौशाद यांची संगीत लाभलेली अजरामर गीते आणि त्यामागील कथाही किणीकर यांनी यावेळी सादर करत नौशाद यांनी केलेल्या चित्रपट संगीताच्या सेवेचा मागोवा घेतला.जेव्हा १९८१ साली अभिनेत्री नुरजहां या मुंबईत एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांनी नौशाद अली यांच्या संगीताची स्तुती करत चित्रपट ‘अनमोल घडी’मधील ‘क्या मिल गया भगवान...’ हे गीत मला खूपच भावल्याचे सांगत ते गायलेही होते, असे किणीकर यांनी यावेळी सांगितले. अभिनेता व गायक कुंदनलाल सहगल यांच्यासोबत नौशादजी यांनी काम केले. सहगल यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेप्रसंगी ‘जब दिल ही तूट गया...’ हे गीत वाजविण्यात आले होते, अशी आठवणही किणीकर यांनी यावेळी सांगितली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक