ओझरटाऊनशिप : श्रीक्षेत्र वेरुळ येथील निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने ३४ वी राष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.या शिबिराच्या सांगते प्रसंगी स्वामी शांतीगिरी महाराजांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.भारतीय योग कल्चर असोसिएशनचे सचिव दिबिदू सहा, महाराष्ट्र कल्चर असोसिएशनचे सचिव सुरेश गांधी, जगन्नाथ काळे, आश्रमीय संत रामानंद महाराज, दिनेश भुतेकर, सोमनाथ रोकडे आदी शिबिराप्रसंगी उपस्थित होते.देशभरातील २१ राज्यातून जवळपास १००० स्पर्धक या वेळी सहभागी झाले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी किरण शिंदे, तुलजेश चौधरी या वेळी उपस्थित होते.
जनार्दन स्वामी आश्रमात राष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धा यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 23:11 IST
ओझरटाऊनशिप : श्रीक्षेत्र वेरुळ येथील निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने ३४ वी राष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
जनार्दन स्वामी आश्रमात राष्ट्रीय योगासन चॅम्पियन स्पर्धा यशस्वी
ठळक मुद्देवेरुळ : शांतीगिरी महाराजांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण