शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पक्ष्याचे दुर्दैव : वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप

By admin | Updated: March 26, 2015 22:51 IST

नागापूरला तेरा मोरांचा मृत्यू

मनमाड : येथून जवळच असलेल्या नागापूर येथे १३ मोरांचा मृत्यू झाला आहे. चार मोर मृत्युमुखी पडल्यानंतर पशुवैद्यकीय विभागाला कळवूनही वैद्यकीय पथक उशिराने पोहोचल्याने जिवाच्या आकांताने तडफडणाऱ्या नऊ मोरांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर पक्ष्याच्या बाबतीत शासकीय यंत्रणेकडून गांभीर्य बाळगण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.नागापूर येथे इंधन कंपनीच्या मागील बाजूस रेल्वे लाइनच्या कडेला काही मोर मृतावस्थेत असल्याची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन या बाबतची माहिती शासकीय यंत्रणेला कळवली. चार मोर मृत्युमुखी पडले होते तर अन्य नऊ मोर तडफडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल तीन तासांपेक्षा अधिक कालावधी लागल्याने नउ मोरांचा मृत्यू झाला. एकाच वेळी १३ मोर मृत्युमुखी पडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एल. साबळे, डॉ. एस. बी. गोंदकर यांनी मृत मोरांचे शवविच्छेदन करून अवशेष तपासणीसाठी नाशिक येथे पाठविले. शवविच्छेदनानंतर मोरांचे मृतदेह वन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली असून, मोरांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला. असे असले तरी एकाच वेळी १३ मोर मृत्युमुखी पडल्याने विषबाधा झाली असावी का? संशय व्यक्त केला जात आहे.दरम्यान, याबाबत पशुवैद्यकीय ैअधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अतिरिक्त आरोग्य केंद्राचा कार्यभार असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)