अमेरिकन फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत तेलंगणाला विजेतेपद तर दिल्लीला उपविजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 18:25 IST2018-03-22T18:25:20+5:302018-03-22T18:25:20+5:30

नाशिकमहाराष्ट्र  अमेरिकन फुटबॉल असोसिएशन आणि कै.केएनडी बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या अमेरिकन फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्लीला नमवून तेलंगाणा संघाने विजेतेपद पटकाविले. गेल्या १९ मार्च पासून खुल्या गटाच्या अमेरिकन फुटबॉल या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात दिले होते.

nasik, american, football, national, championship, Telangana won | अमेरिकन फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत तेलंगणाला विजेतेपद तर दिल्लीला उपविजेतेपद

अमेरिकन फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत तेलंगणाला विजेतेपद तर दिल्लीला उपविजेतेपद

ठळक मुद्दे विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे अंतिम सामन्यात १७ गुणांच्या फरकामुळे तेलंगणा संघाला विजेतेपद

नाशिक: महाराष्ट्र  अमेरिकन फुटबॉल असोसिएशन आणि कै.के एन डी बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या अमेरिकन फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्लीला नमवून तेलंगाणा संघाने विजेतेपद पटकाविले. गेल्या १९ मार्च पासून खुल्या गटाच्या अमेरिकन फुटबॉल या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात दिले होते.
या स्पर्धेत दल्ली आणि तेलंगणा यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात तेलंगणाने उपांत्य फेरीसारखाच अष्टपैलू खेळ करून दिल्ली संघावर प्रथमपासून वर्चस्व राखण्यात यश मिळविले. पहिल्या सत्रात तेलंगणाने दिल्लीच्या खेळाडंूना फारशी संधी दिली नाही. त्यामुळे दिल्ली संघाला केवळ सहा गुण मिळविता आहे. तर त तेलंगणाच्या खेळाडूंनी आक्र मक खेळ करत सोळा गुण वसूल करून १० गुणांची आघाडी मिळविली.
दुसऱ्या सत्रातही तेलंगणाच्या खेळाडूंनी असाच आक्र मक खेळ केला. त्यामुळे दिल्लीला चारच गुण मिळविता आले.तर तेलंगणाच्या खेळाडूंनी ११ गुण वसूल करण्यात यश मिळविले. या १७ गुणांच्या फरकामुळे तेलंगणा संघाने हा अंतिम सामना आपल्या नावावर करून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. तर दिल्ली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याआधी झालेल्या तिसºया क्र मांकाच्या सामन्यात कर्नाटक संघाने यजमान महाराष्ट्र संघावर १२ विरु द्ध ०७ अश्या १२ गुणांची आघाडी मेळवून हा सामना जिंकून तिसरा क्र मांक मिळविला.
पारितोषिक वितरण नाशिक विभागाचे प्रभारी क्र ीडा उपसंचालक रवींद्र नाईक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आॅलीम्पिक असोसिएशनचे सदस्य अशोक दुधारे, महाराष्ट्र अमेरीकन फुटबॉल असोसिएशनचे कार्यकारी अधिकारी संदीप चौधरी, मध्यप्रदेश आॅलीम्पिक असोसिएशनचे सचिव दिग्विजय सिंग आदी उपस्थित होते. संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन हिंगमिरे, दीपक निकम, मनीषा काठे, प्रवीण कुमार रेड्डी आदिंनी प्रयत्न केले.
स्पर्धाचा निकाल तेलंगणा - विजेता, दिल्ली - उपविजेता, कर्नाटक - तृतीय क्र मांक

फोटो ओळ :- अमेरिकन फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या तेलंगणा संघाच्या खेळाडूंना मानाचा चषक देतांना प्रमुख पाहुणे नाशिक विभागाचे क्रीडा  उपसंचालक रवींद्र नाईक, सोबत अशोक दुधारे, संदीप चौधरी, दिग्विजय सिंग आदी.

Web Title: nasik, american, football, national, championship, Telangana won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.