गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 19:39 IST2018-08-03T19:39:07+5:302018-08-03T19:39:42+5:30
नाशिक : घराच्या गॅलरीतून खाली पडल्याने सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि़१) रात्री सिडकोतील मोरवाडीत घडली़ भागवत रामेश्वर जंजाळ (१७, रा. दत्तमंदिराजवळ, मोरवाडी, सिडको) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे़

गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यू
ठळक मुद्देसिडकोतील घटना
नाशिक : घराच्या गॅलरीतून खाली पडल्याने सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि़१) रात्री सिडकोतील मोरवाडीत घडली़ भागवत रामेश्वर जंजाळ (१७, रा. दत्तमंदिराजवळ, मोरवाडी, सिडको) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास भागवत जंजाळ हा घराच्या गॅलरीतून तोल जाऊन खाली पडला़ यामध्ये त्यांच्या डोक्यास व पाठीस गंभीर मार लागल्याने कुटुंबियांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़