नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो क्रमांक-१ व २ मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या कामांच्या वेळाविषयीच्या तक्रारी असल्याने महामंडळाच्या कामगार अधिकाऱ्यांनी पंचवटीतील डेपोला सकाळी ९ वाजताच भेट देऊन कर्मचाºयांची हजेरी तपासली. विशेष म्हणजे अधिकारी हजेरी तपासत असल्याचा निरोप पोहचल्यामुळे डेपोतील काही अधिकारी धापा टाकतच डेपोत पोहचल्याचे समजते. या अधिकाºयांवर आता काय कारवाई केली जाणार याकडे कामगारांचे लक्ष लागून आहे.महामंडळाच्या डेपोस्तरावरील कामगारांच्या कामाच्या पद्धती तसेच त्यांच्या ड्युटीबाबतच्या गंभीर तक्रारी आहेतच शिवाय आता राज्यातील अनेक आमदारांचे गेल्या काही दिवसांत महामंडळाच्या कारभाराकडे लक्ष असल्याने महामंडळदेखील दक्ष झाले आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय कार्यालयातील कामगार अधिकाºयाने शहरातील दोन्ही डेपोत सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान, अचानक भेट देऊस हजेरी तपासली. डेपोतील काही महत्त्वाच्या अधिकाºयांची ड्युटी सकाळी ८ वाजता सुरू होते, तर अन्य कर्मचाºयांची ड्युटी सकाळी १० वाजता सुरू होती. १० वाजेचे कर्मचारी कामावर हजर असतांना सकाळच्या ड्युटीतील अधिकारी मात्र हजर नसल्याचा प्रकार समोर आला मात्र याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
कामगार अधिकऱ्याने डेपोत घेतली ‘हजेरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 19:18 IST
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो क्रमांक-१ व २ मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या कामांच्या वेळाविषयीच्या तक्रारी असल्याने महामंडळाच्या कामगार ...
कामगार अधिकऱ्याने डेपोत घेतली ‘हजेरी’
ठळक मुद्देएसटी महमंडळ : शहरातील दोन्ही डेपोंची केली तपासणी