तरुणीचा विनयभंग करून अॅसिड टाकण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 18:24 IST2018-03-13T18:24:22+5:302018-03-13T18:24:22+5:30
नाशिक : तरुणीस भर रस्त्यात अडवून विवाहाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याची घटना उपनगर परिसरातील इच्छामणी लॉन्ससमोर घडली़

तरुणीचा विनयभंग करून अॅसिड टाकण्याची धमकी
नाशिक : तरुणीस भर रस्त्यात अडवून विवाहाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याची घटना उपनगर परिसरातील इच्छामणी लॉन्ससमोर घडली़
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगर परिसरातील पंचवीस वर्षीय तरुणी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यालयातील कामकाज आटोपल्यानंतर घरी जात असताना ओळखीतील संशयित रवींद्र भास्कर बस्ते (२५, खेडगाव, शिंदवड, पिंपळगाव) याने रस्त्यात थांबविले़ यानंतर अचानक विवाहाची मागणी करून विनयभंग केला़
यानंतर तरुणीस दुसरीकडे विवाह होऊ देणार नसल्याचे आणि पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची तसेच तोंडावर अॅसिड टाकून चेहरा विद्रूप करण्याची धमकी दिली़
या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित रवींद्र बस्ते याच्या विरोधात उपनगर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़