व्होडाफोन स्टोअरच्या व्यवस्थापिकेने केला लाखोंचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:45 IST2018-05-16T19:45:17+5:302018-05-16T19:45:17+5:30
नाशिक : व्होडाफोन स्टोअरमधील व्यवस्थापिकेने सुमारे आठ लाखांचा अपहार करुन कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित डॉली विजय चंद्रात्रे (२८, रा. बिल्डिंग ३, शुभम पार्क, उत्तमनगर, सिडको, नाशिक) या व्यवस्थापिकेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

व्होडाफोन स्टोअरच्या व्यवस्थापिकेने केला लाखोंचा अपहार
नाशिक : व्होडाफोन स्टोअरमधील व्यवस्थापिकेने सुमारे आठ लाखांचा अपहार करुन कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित डॉली विजय चंद्रात्रे (२८, रा. बिल्डिंग ३, शुभम पार्क, उत्तमनगर, सिडको, नाशिक) या व्यवस्थापिकेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात कंपनीच्या वतीने प्रशांत लखीचंद हिंदुजा (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनजवळ व्होडाफोन कंपनीचे व्होडाफोन स्टोअर आहे. या स्टोअरमध्ये डॉली चंद्रात्रे या व्यवस्थापिका म्हणून काम करीत होत्या़ १९ ते २६ एप्रिल या कालावधीत चंद्रात्रे यांनी पदाचा दुरुपयोग करून कंपनीच्या पोर्टलवरून ८ लाख ९४ हजार ८३४ रुपयांचा आर्थिक व्यवहार केला़ यानंतर २६ एप्रिल २०१८ रोजी व्होडाफोनच्या पोर्टलच्या खात्यावर केवळ ५० हजार रुपये जमा करून उर्वरीत ८ लाख ३७ हजार ३४ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली़
दरम्यान, कंपनीच्या हिशोबात रकमेची तूट आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ त्यानुसार चौकशी केल्यानंतर संशयित व्यवस्थापक डॉली चंद्रात्रे हिने अपहार केल्याचे कंपनीच्या लक्षात आले़ त्यानुसार हा अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़