शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

विश्वास नांगरे पाटील दिवसभर नाशिकरोड पोलीसठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 9:02 PM

नाशिकरोड : प्रतिनिधी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलीस चौक्या अधिक सक्षम करणार असल्याची माहिती पोलीस ...

नाशिकरोड : प्रतिनिधीशहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलीस चौक्या अधिक सक्षम करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त बुधवारी दिवसभर नाशिकरोड पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी दिवसभर नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या संपूर्ण कामकाजाची माहिती घेतली. सर्व पोलीस कर्मचा-यांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेषता: महिला कर्मचा-यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. यावेळी त्यांनी सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली. महिला सुरक्षा समितीचीही बैठक घेत महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. सायंकाळी दाखल गुन्हे आणि त्यांचा तपास याविषयी सर्व गुन्हे तपासी अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक घेत त्यांना आवश्यक त्या सुचना केल्या. याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, पोलीस निरीक्षक सुरज बिजली आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आयुक्तांनी स्मार्ट सिटी विभागाच्या पथकासह नागरिकांचीही भेट घेतली. शहरातील वाहतूक कोंडी, अनिधकृत पार्कींग, महिला सुरक्षा, पोलीस कॉलनीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या समस्या, महिला सुरक्षा समितीच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. शहरातील क्यूआर कोडची संख्या २५० इतकी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजीबाजार पालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही त्यानी दिले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस