पंचवटीत तरुणाकडून गावठी कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:28 IST2018-05-05T22:28:28+5:302018-05-05T22:28:28+5:30

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने पंचवटीत सापळा रचून एका संशयिताकडून गावठी कट्टा जप्त केला आहे़ आकाश गणेश पवार (१९, रा़ भाटवाडी, रेणूकामाता मंदिराजवळ, सिन्नर-घोटी हायवे, ता़ सिन्नर, जि़ नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे़ त्याच्यावर आडगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

nashik,unit,one,pistal,recovered,panchvati | पंचवटीत तरुणाकडून गावठी कट्टा जप्त

पंचवटीत तरुणाकडून गावठी कट्टा जप्त

ठळक मुद्दे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने पंचवटीत सापळा रचून एका संशयिताकडून गावठी कट्टा जप्त केला आहे़ आकाश गणेश पवार (१९, रा़ भाटवाडी, रेणूकामाता मंदिराजवळ, सिन्नर-घोटी हायवे, ता़ सिन्नर, जि़ नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे़ त्याच्यावर आडगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

युनिट एकमधील पोलीस शिपाई शांताराम महाले यांना संशयित आकाश पवार हा अमृतधाम चौफुलीजवळील फ्लोरा हाईट इमारतीसमोर गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती़ या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, पोलीस हवालदार रवींद्र बागुल, पोलीस नाईक दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्नील जुंदे्र , राहुल पालखेडे, दीपक जठार यांनी त्यास ताब्यात घेतले़ त्याच्याकडून गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे असा ३१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

Web Title: nashik,unit,one,pistal,recovered,panchvati