नाशिकला दुचाकीवरील संशयितांनी खेचला महिला डॉक्टरचा मोबाइल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 17:32 IST2018-03-16T17:32:05+5:302018-03-16T17:32:53+5:30
नाशिक : रस्त्याने मोबाइलवर बोलत जात असलेल्या पादचाऱ्यांचा दुचाकीवरील संशयितांनी मोबाइल खेचून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ या चोरट्यांनी आता महिलांनाही लक्ष्य केले असून, सिडकोतील एका महिला डॉक्टरचा मोबाइल खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१५) सायंकाळच्या सुमारास उंटवाडी रोडवर घडली़

नाशिकला दुचाकीवरील संशयितांनी खेचला महिला डॉक्टरचा मोबाइल!
नाशिक : रस्त्याने मोबाइलवर बोलत जात असलेल्या पादचाऱ्यांचा दुचाकीवरील संशयितांनी मोबाइल खेचून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ या चोरट्यांनी आता महिलांनाही लक्ष्य केले असून, सिडकोतील एका महिला डॉक्टरचा मोबाइल खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१५) सायंकाळच्या सुमारास उंटवाडी रोडवर घडली़
सिडकोतील दत्तमंदिर स्टॉप परिसरातील डॉ़ स्मिता चौगुले या रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास उंटवाडी रोडवरील बीएसएनएल गेटसमोरून आपल्या दुचाकीवरून (एमएच ०२, डीव्ही ४००४) जात होत्या़ चौगुले या मोबाइलवर बोलत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्याने त्यांचा दहा हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा मोबाइल खेचून नेला़
या प्रकरणी डॉ़ स्मिता चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़