दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून छेडखानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:57 IST2018-08-04T14:54:38+5:302018-08-04T14:57:11+5:30
नाशिक : दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांची छेडखानी करून शिवीगाळ केल्याची घटना सातपूर अशोकनगर बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी सातमाऊली चौकातील तीन संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून छेडखानी
नाशिक : दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांची छेडखानी करून शिवीगाळ केल्याची घटना सातपूर अशोकनगर बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी सातमाऊली चौकातील तीन संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकनगर परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली गुरुवारी (दि़२) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पायी जात होत्या़ यावेळी अॅक्टिवा दुचाकीवरून आलेले संशयित प्रतिक एडकी, रोहीत बल्लाळ, साजन अन्सारी (तिघेही रा़ सातमाऊ ली चौक, सातपूर) यांनी या मुलींना रस्त्यात अडविले़ यानंतर या दोन्ही मुलींसोबत छेडखानी करून त्यांचा विनयभंग केला़ तसेच तुमची घमेंड उतरवतो असे म्हणून शिवीगाळ करीत धमकी दिली़
या प्रकरणी पिडीत मुलींनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़