दुचाकीवरील दोघा भावांची चौघा सशयितांकडून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:55 IST2018-07-20T17:52:57+5:302018-07-20T17:55:54+5:30
नाशिक : दुचाकीवरून जात असलेल्या दोन भावांना चौघा संशयितांनी अडवून जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे़

दुचाकीवरील दोघा भावांची चौघा सशयितांकडून लूट
नाशिक : दुचाकीवरून जात असलेल्या दोन भावांना चौघा संशयितांनी अडवून जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पेश पाटील (रा़ पाथर्डी फाटा)हे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या भावासमवेत दुचाकीवरून जात होते़ आनंदनगरमधील देवराज धनदायी रो-हाऊसच्या समोरून जात असताना संशयित राजू गणेश कटाळे व त्याच्या इतर तीन साथीदारांनी दुचाकी अडविली़ यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील १८ हजार रुपये किमतीचा सोन्याच्या चेनमधील सहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा बळजबरीने ओढून पळवून नेला.
इंदिरानगर पोलिसांनी संशयित राजू कटाळे यास अटक केली असून उर्वरीत तिन साथीदारांचा शोध सुरू आहे़