आडगावला भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 17:56 IST2018-07-15T17:55:41+5:302018-07-15T17:56:29+5:30
नाशिक : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोरच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास घडली़ राजनारायण राजकुमार गिरी (३७, रा. रमवापूर, पो. उजी, ता. हरैया जि. बस्ती (उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे़

आडगावला भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार
नाशिक : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोरच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास घडली़ राजनारायण राजकुमार गिरी (३७, रा. रमवापूर, पो. उजी, ता. हरैया जि. बस्ती (उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे़
शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास राजनारायण गिरी हे हॉटेल जत्रासमोरील सयाजी पॅलेस हॉटेलसमोरून पायी जात होते़ त्यावेळी भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने (एमएच ४१ एपी ८७२) गिरी यांना जोरदार धडक दिली़ यामध्ये गिरी यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार सुशील पवार (२४, बलसागर सोसायटी, आडगाव) हा जखमी झाला असून, त्याच्यावर आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.